


माजी महापौर हनुमंतराव भोसले , संजय मंगोडेकर ,धम्मराज साळवे यांच्या हस्ते झाले

पिंपरी, ता. ११: पिंपरी चिंचवड शहरामध्ये सलमानी समाजाची संख्या अधिक प्रमाणात असून त्यांचे प्रश्न सोडवण्या करीता व त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता अखिल सलमानी समाज विकास संस्था कार्य करत आहे , अखिल सलमानी समाज विकास संस्था अनेक वर्षांपासून सामाजिक , शैक्षणिक,आर्थिक सक्षमीकरण उपक्रम राबवत असते.
दिनांक ०९/१२/२०२४ सोमवार रोजी सायंकाळी ४ वाजता नेहरूनगर येथे अखिल सलमानी समाज विकास अखिल सलमानी समाज विकास संस्थेच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन माजी महापौर हनुमंतराव भोसले ,भाजपा सरचिटणीस संजय मंगोडेकर ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच अखिल सलमानी पतसंस्थेच्या सभासद नोंदणीचा शुरुआत करण्यात आली!

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख नशीम सलमानी
अखिल सलमानी समाज विकास संस्थेच्या माध्यमातून आम्ही समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाचा विकास त्याच बरोबर आरोग्य ,शिक्षण ,आर्थिक विकास यासाठी काम करणार आहोत आज संपर्क कार्यालयाचे उदघाटन झाले येथून सर्व कामकाज होईल .
माजी महापौर हनुमंतराव भोसले
सलमानी समाजाच्या कार्यालयाचे उदघाटन झाले आनंद वाटला आमच्या प्रभागातून त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली त्यांचे कार्य आणि विस्तार वाढत जाओ या सदिच्छा आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे
अखिल सलमानी समाज विकास संस्थेच्या माध्यमातून उत्तम कार्य घडत आहे . आपल्या प्रगतीकरिता टाकलेले पहिलं पाऊल ठरेल समाजाचा आर्थिक विकास आणि सामाजिक सक्षमीकरण हे ध्येय महत्वाचे आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा आहेत .
यावेळी राजन गुंजाळ ,दीपक भंडारी ,संतोष शिंदे ,संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शेख महबूब , कार्याध्यक्ष शेख सिकंदर, शेख जलालुद्दीन , शेख हैदर, शेख इकराम ,शेख रिजवान ,शेख महमूद , शेख आलम ,शेख समशेर ,शेख कय्यूम , शेख कासिम, शेख हजरत,शेख सलमान,शेख, सुलतान,शेख फारुख,शेख शौकत, शेख सोएब, शेख सलीम, आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️