Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रॅप’ प्रकल्पाची सुरुवात
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Tech

पिंपरी चिंचवड शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रॅप’ प्रकल्पाची सुरुवात

suwarna gaware 11/12/2024
Official_Logo_of_PCMC
Spread the love

प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवेच्या गुणवत्तेच्या अंदाजावर निरीक्षणाद्वारे होणार ठोस कृती

पिंपरी, ता. ११ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ (GRAP) प्रकल्पाची सुरुवात केली आहे. याप्रकल्पामध्ये शहराची हवेची गुणवत्ता पद्धतशीरपणे सुधारली आहे याची खात्री करण्यासाठी वास्तविक वेळेमध्ये निरिक्षण प्रणाली, अत्याधुनिक अंदाज आणि तात्काळ अंमलबजावणी यांचा समावेश आहे.

सदर प्रकल्पासाठी ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (C-DAC) द्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ग्रॅप (GRAP) उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून महानगरपालिकेने हवेच्या गुणवत्तेच्या आव्हानांचा अंदाज, निरीक्षण आणि सक्रियपणे कृती करण्यासाठी महत्वाचे धोरण तयार केले आहे.

यासोबतच, महानगरपालिकेने नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (NCAP) च्या अंतर्गत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महापालिका हद्दीमध्ये हवा शुद्धीकरण प्रणाली, धुके घालविणारी उपकरणे, रस्ता साफसफाई करणारी उपकरणे (रोड वॉशर) आणि पिचकारी आधारित पाण्याचे फवारे असणारी प्रणाली अशा विविध बाबींच्या माध्यमातून हवा प्रदुषित होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

ग्रॅप प्रणाली द्वारे हवेच्या गुणवत्तेबाबत असे केले जाणार निरिक्षण…

१. ग्रॅप प्रणालीच्या दोन, तीन व चार या टप्प्यांतर्गत सुधारित हवेच्या गुणवत्तेचा अंदाज हे सी-डॅक (C-DAC) च्या ‘निर्णय समर्थन प्रणाली’ नुसार हवेच्या गुणवत्तेच्या अंदाजांवर तीन दिवस अगोदर सुरू केले जातील. सुचविण्यात आलेले उपाय किमान १५ दिवसांसाठी किंवा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) मध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येईपर्यंत लागू करण्यात येतील. महानगरपालिका सी-डॅकच्या अंदाजानुसार, शहराच्या सर्व भागामधील पीएम २.५, पीएम १०, एनओ एक्स, एसओ एक्स सारख्या प्रदूषकांवर लक्ष केंद्रित करणार आहे.

२. वाहनांच्या प्रदूषणाची कठोर देखरेख ठेवण्यासाठी महत्वाची यंत्रणा निर्माण केली असून यामध्ये ANPR कॅमेरे आणि प्रत्यक्षरित्या कामावर असणारे कर्मचारी हे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि आणि वाहतूक पोलिस यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या आधारे एकात्मिक प्रणालीद्वारे उत्सर्जन नियंत्रण अनुपालन (ECC) ट्रॅक करतील.

३. औद्योगिक आणि बांधकाम प्रदूषणावर एक पाळत ठेवणारी एजन्सी नेमण्यात आली असून यामध्ये ३२ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह ती आठ वॉर्डांमध्ये, उल्लंघनाच्या सदैव निरीक्षणासाठी तैनात करण्यात आली आहे. चौकट – हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या स्तरांवर चार टप्प्यांचा ग्रॅपचा कृती आराखडा…शहरातील हवेच्या गुणवत्तेच्या पातळीनुसार त्यावर उपाय करण्यात येणार आहेत. यामध्ये उपाययोजनांसाठी हवा गुणवत्ता निर्देशांकाचा आधार घेऊन त्याआधारे चार टप्पे करण्यात आले आहेत.

टप्पा १ – (हवा गुणवत्ता निर्देशांक १०१ – ३००) : रस्त्यावरील धूळ नियंत्रित करणे, बेकायदेशीर कचऱ्याची विल्हेवाट लावणे, वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार.

टप्पा २ – (हवा गुणवत्ता निर्देशांक ३०१ – ४००) : डिझेल जनरेटरवरील निर्बंध, रस्त्यांची स्वच्छता आणि सार्वजनिक वाहतुकीचा प्रचार यांचा समावेश आहे.

टप्पा ३ – (हवा गुणवत्ता निर्देशांक ४०१- ५००) : अत्यंत प्रदूषण करणारे उद्योग बंद करण्यात येणार, वाहनांच्या प्रतिबंधात्मक क्षेत्र तयार करुन उल्लंघनावर कठोर दंड आकारण्यात येणार. टप्पा ४ – (हवा गुणवत्ता निर्देशांक ५०० हून अधिक) : प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहन बंदी, संभाव्य शाळा बंद आणि कडक दंड लागू करण्यात येणार.

प्रदूषणाबाबत पाळत ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून रात्रं-दिवस गस्त…

महानगरपालिकेने ग्रॅप प्रणालीचा एक भाग म्हणून पर्यावरणीय प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ठोस उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रदुषणाबाबत पाळत व दक्षता ठेवण्यासाठी, विविध प्रकारच्या कचरा – संबंधित व पर्यावरणीय उल्लंघनांवर नियंत्रण व गस्त घालण्यासाठी एक समर्पित एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये १ प्रोजेक्ट मॅनेजर, ४ पर्यवेक्षक, २ डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि ३२ जणांचा प्रत्यक्ष जागेवरील कर्मचाऱ्यांचा व ३९ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये नेमण्यात आलेल्या एजन्सीद्वारे स्वच्छ इंधन वाहनांचा वापर करून कर्मचाऱ्यांकडून शहरामध्ये रात्र-दिवस गस्त घालण्यात येईल.

म्हणून ग्रॅप प्रकल्प आहे महत्वाचा…

१) सक्रियपणे हवेच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन: ग्रॅपच्या माध्यमातून हवा गुणवत्ता निर्देशांकांच्या अंदाजांवर आगाऊ उपायांवर शोधले जाऊन प्रदूषणाची जोखीम प्रभावीपणे कमी करण्यास मदत होते. २) संरचित दृष्टीकोन: हे वायू प्रदूषणाच्या विविध स्तरांवर म्हणजेच मध्यम ते गंभीर अशा टप्प्याटप्प्याने प्रतिसाद योजना तयार करुन त्याची अंमलबजावणी करण्यात येते. ३) सार्वजनिक आरोग्याचे रक्षण: ग्रॅपनुसार थेट प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांवर उपयायोजना केल्याने खराब हवेच्या गुणवत्तेशी संबंधित आरोग्य धोके कमी करण्यात मदत होते. ४) शहरी राहणीमानामध्ये सुधारणा: नागरिकांचा सहभाग व हवेच्या गुणवत्तेसाठी विविध आधारावर विविध घटकांची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी केल्याने नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यास मदत होते.

‘ग्रॅप’ म्हणजे शहराला प्रदुषणमुक्त करण्याच्या प्रक्रियेतील एक मैलाचा दगड !

“पिंपरी चिंचवड शहराला प्रदुषणमुक्त करण्यासाठी ग्रॅप सारखा उपक्रम सुरु करणे म्हणजे शहराला प्रदुषणमुक्त करण्याच्या प्रक्रियेमधील एक मैलाचा दगड आहे. प्रगत तंत्रज्ञान, वास्तविक देखरेख आणि नागरिकांचा सहभागासह आम्ही शाश्वत विकासाला चालना देत आमच्या नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचे ध्येय ठेवले आहे.

सदर उपक्रम पद्धतशीरपणे प्रदूषणाचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आला असून मी शहरातील सर्व घटकांना हे अभियान यशस्वी करण्यासाठी आपला सहभाग देण्याचे आवाहन करतो.”

-शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

ग्रॅप’ उपक्रम म्हणजे शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठीचा प्रशासनाच्या वचनबद्धतेचा पुरावाच! “ ग्रॅप उपक्रमामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून वास्तविक देखरेखची अंमलबजावणी करण्यात येते. यामुळे प्रदूषण होणाऱ्या घटकांवर प्रभावीपणे कारवाई करण्यास मदत होत असून हा प्रकल्प शहराच्या शाश्वत विकासासाठी महत्वाची भूमिका पार पाडतो. शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सदर उपक्रम म्हणजे प्रशासनाच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.”

संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 60
Tags: #ग्रॅप Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: “संस्कृती एकत्रित योगदानातून समृद्ध होते!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस
Next: अखिल सलमानी समाज विकास संस्थेच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.