Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • हिंजवडी आयटी ‘फ्रेशर्स’ फसवणूक प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

हिंजवडी आयटी ‘फ्रेशर्स’ फसवणूक प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

suwarna gaware 10/03/2026
8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce
Spread the love

आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

आरोपींची सव्वा कोटींची मालमत्ता जप्त; फसवणुकीची रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाची पावले

पिंपरी-चिंचवड 10 मार्च : पुणे जिल्ह्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील ‘फ्लायनॉट सास प्रा. लि.’ (Flynaut Saas Pvt. Ltd.) या कंपनीने शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुण पदवीधरांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचे प्रकरण समोर आले होते. या गंभीर विषयावर आमदार  शंकर जगताप  यांनी आक्रमक भूमिका घेत विधानसभेत (दि . 10) तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

आमदार शंकर जगताप यांनी तारांकित प्रश्नाच्या (प्रश्न क्रमांक २७८६८) माध्यमातून हिंजवडी आयटी पार्कमधील ‘फ्लायनॉट सास प्रा. लि. कंपनीने बेरोजगार तरुण पदवीधारकांच्या केलेल्या फसवणुकीचा मुद्दा सभागृहासमोर मांडला होता.

याविषयी माहिती देताना त्यांनी  की, हिंजवडी आयटी पार्क येथील ‘फ्लायनॉट सास प्रा. लि. या  कंपनीने ऑगस्ट २०२५ मध्ये  वेगवेगळ्या कन्सल्टीच्या माध्यमातून  फ्रेशर्स इंजिनीअर उमेदवारांना मोठ्या वार्षिक पगाराचे अमिष दाखवले. तसेच उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात आगऊ रक्कम स्वीकारून त्यांना कामाला लावतो, अस सांगून आणि विश्वास संपादन केला.

नियुक्तीपूर्वी ट्रेनिंग आणि इतर कारणांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून १ लाख ते २.५० लाख रुपयांपर्यंतची रक्कम कंपनीच्या बँक खात्यावर भरून घेण्यात आली. त्यानंतर काही महिने ऑनलाइन काम करून घेतले. परंतु प्रत्यक्षात पगार दिला नाही. शेवटी पात्रता परीक्षा किंवा इंटरव्ह्यूमध्ये नापास झाल्याचे कारण देऊन अनेक विद्यार्थ्यांना कंपनीत रुजू करून घेण्यास नकार दिला.सोबतच फ्रेशर्स उमेदवारांची कोट्यावधी रुपयाची आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणात हिंजवडी पोलीस स्टेशन येथे उपेश रंजीत पाटील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची गांभीर्यता शासनाच्या निदर्शनास आणून दिली.

दरम्यान दोषींवर काय कारवाई करण्यात आली असून, विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली रक्कम त्यांना परत मिळण्याबाबत कोणती पावले उचलली जात आहेत. असे आमदार जगताप यांनी विचारले, त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आता पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.


 
आरोपींची सव्वा कोटींची मालमत्ता जप्त

हिंजवडी आयटी पार्क येथील या फसवणूक प्रकरणात केवळ गुन्हे दाखल करून न थांबता, पीडित विद्यार्थ्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कठोर पवित्रा घेतला आहे असे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या आतापर्यंत ३५७ पीडितांची ६ कोटी ४९ लाख ९६ हजार ७३१ रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी, ‘फ्लायनॉट सास प्रा. लि.’ कंपनीचे संस्थापक आणि कार्यरत कर्मचारी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करत असतानाच, त्यांची १ कोटी २७ लाख २५ हजार ७८० रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे ४८ लाख २५ हजार ७८० रुपये किमतीच्या जंगम मालमत्तेचा  आणि ७९ लाख रुपये किमतीच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. फसवणुकीच्या पैशातून घेतलेल्या या मालमत्तेवर टाच आणून, कायदेशीर प्रक्रियेद्वारे ही रक्कम पुन्हा बाधित विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विशेष तपास पथकामार्फत (SIT) पुढील प्रक्रिया राबवली जात आहे.
 
“आयटी क्षेत्रातील तरुणांची होणारी ही फसवणूक अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाचा तपास केवळ कागदावर राहू नये, तर प्रत्येक पीडित विद्यार्थ्याला त्याचे हक्काचे पैसे परत मिळावेत आणि अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर जरब बसवावी, हीच माझी  प्रमुख मागणी आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून आता या प्रकरणाचा छडा लागेल.”असा विश्वास आहे . 

 शंकर जगताप, आमदार (चिंचवड विधानसभा मतदारसंघ)

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 26
Tags: #Adhiveshan #shankar jagtap #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग फरकाचा प्रश्न मार्गी!
Next: घरेलू कामगारांचा मुंबईत महामोर्चा

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.