


वाकड, ता.१२ : प्रभाग क्रमांक २५ मधील सोसायट्या आणि वस्ती भागातही नागरिकांचा भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला वाढता पाठींबा पाहता, प्रभागात आणि महापालिकेत शंभर टक्के कमळ फुलणार असल्याचा ठाम विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रभाग २५ चे अधिकृत उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.

प्रभाग २५ मधील भाजपचे उमेदवार राहुल कलाटे, श्रुती वाकडकर, कुणाल वाव्हळकर व रेश्मा भुजबळ यांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेतली आहे. विकासकामांच्या मुद्द्यांवर ते प्रचार करत जनतेशी संवाद साधत आहेत. वाकड, ताथवडे, पुनावळे भागात कोपरा सभा व बैठकांत पॅनलप्रमुख राहुल कलाटे प्रभागासह महापालिकेतही बहुमताने कमळ फुलणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत. नागरिकही त्यांच्या या भूमिकेबद्दल सकारात्मक असून “विकासच हवा आणि फक्त भाजपच विकास करू शकते” असा विश्वास व्यक्त करत आहेत.
महापालिका निवडणूक ही जनतेच्या विश्वासावर, लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या विकासकामावर आणि येत्या काळात करायच्या प्रभागाच्या विकासावरच व्हावी असा आमचा मानस असल्याची भावना चारही उमेदवारांनी व्यक्त केली आहे. आमचा प्रभाग विकासाचे मॉडेल बनून समोर येत आहे, येत्या काळात आपल्याला देवेंद्रभाऊंच्या साथीने आमूलाग्र बदल दिसेल असे प्रतिपादन करत “कलाटे म्हणजे कमळ, वाकड म्हणजे कमळ असेच भविष्य असेल” असे म्हणत श्रुती वाकडकर, रेश्मा भुजबळ व कुणाल वाव्हळकर यांनी आपली भविष्याची राजकीय दिशा स्पष्ट केली. भूलथापांना, खोट्या प्रचाराला बळी पडू नका असेही आवाहन त्यांनी केले.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २५ मध्ये ‘कमळ’ फुलणार असून महापालिकेतही बहुमताने सत्ता येईल. येत्या निवडणुकीत वाकड म्हणजे ‘कमळ’, ताथवडे म्हणजे ‘कमळ’, पुनावळे म्हणजे ‘कमळ’ असे चित्र पाहायला मिळेल! यापुढे जाऊन सांगतो, भुजबळ म्हणजे कमळ, वाव्हळकर म्हणजे कमळ, वाकडकर म्हणजे कमळ आणि कलाटे म्हणजेही कमळच! जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेल, याबाबत खात्री आहे.”
- राहुल कलाटे
भाजपा उमेदवार, प्रभाग क्रमांक २५
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेसारख्या असंख्य योजना, खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपला आशीर्वाद देतील, याबाबत उमेदवार म्हणून आम्हाला खात्री आहे. कारण भाजपचे काम बोलते. निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांच्या भावना आणि मिळालेला प्रतिसाद, येणाऱ्या निवडणुकीत ‘कमळ’ चिन्हाला मिळालेले पाठबळ ठरणार आहे.
- श्रुती राम वाकडकर
उमेदवार, प्रभाग क्रमांक २५
भाजपा हा प्रत्येक कार्यकर्त्याला समान संधी आणि न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष- आरपीआय युतीसाठी विकास, विश्वास आणि जनतेचा आशीर्वाद ह्याच जमेच्या बाजू असणार आहेत. भाजपचे शहरासाठीचे व्हिजन आणि मिशन त्याचप्रमाणे राहुलदादा कलाटे यांचा प्रभागातील दांडगा जनसंपर्क या बळावर प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपचा विजय निश्चित आहे.
- कुणाल वाव्हळकर
उमेदवार प्रभाग क्रमांक २५
आज प्रभागासह शहरातील जनतेसाठी विश्वासाचे नाव भाजप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि आजवर शहरात झालेली विकासकामे हीच भाजपच्या यशाची खात्री असून, निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना आणि विजयासाठी दिलेले आशीर्वादच, प्रभागात भाजपाची ताकद दाखवत आहेत.
- रेश्मा चेतन भुजबळ
उमेदवार प्रभाग क्रमांक २५

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
