Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • कष्टकरी संघ, महाराष्ट्र महासंघाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग १६ मधील पॅनलला जाहीर पाठिंबा
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

कष्टकरी संघ, महाराष्ट्र महासंघाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग १६ मधील पॅनलला जाहीर पाठिंबा

suwarna gaware 08/01/2026
440cd74f-1eaa-4a4c-877a-1a9ba77b8d71
Spread the love


मेहनती हातांची ताकद ‘घड्याळा’सोबत; विजयाचा विश्वास अधिक दृढ


पिंपरी, दि. ८ :कष्टकरी कामगार, श्रमिक आणि मेहनती हातांची एकजूट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी उभी राहत असल्याचे चित्र प्रभाग क्रमांक १६ मध्ये पाहायला मिळत आहे. कष्टकरी संघ, महाराष्ट्र राज्य संघटना यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभाग १६ मधील अधिकृत पॅनलला गुरुवारी जाहीर आणि ठाम पाठिंबा देण्यात आला.
या पाठिंब्याची घोषणा कामगारांचे ज्येष्ठ नेते काशिनाथ नखाते यांनी करत, प्रभाग १६ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चारही उमेदवारांवर कष्टकरी समाजाचा पूर्ण विश्वास असल्याचे ठामपणे सांगितले.


या पॅनलमध्ये श्रेया अक्षय तरस–गायकवाड (अनुसूचित जाती – अ गट),
जयश्री मोरेश्वर भोंडवे (नागरिकांचा मागास प्रवर्ग – ब गट),आशा तानाजी भोंडवे (सर्वसाधारण महिला – क गट),
मोरेश्वर महादू भोंडवे (सर्वसाधारण – ड गट, पॅनल प्रमुख व माजी नगरसेवक) यांचा समावेश आहे.

यावेळी व्यासपीठावर कष्टकरी संघाचे कार्याध्यक्ष राजू बिराजदार, निमंत्रक किरण ताडेकर, तसेच सुनील भोसले, संदीप भोसले, अनिल कदम, सोनू गुप्ता, अरुण जमादार, रोहिदास सातपुते आदी पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय पोलीस पाटील दिवाणजी भोंडवे, अक्षय तरस, तानाजी भोंडवे यांच्यासह भोंडवे कुटुंबातील अनेक सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमात बोलताना कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले,
कामगार, श्रमिक आणि मेहनती लोकांचा खरा आवाज विधानसभेत आणि महापालिकेत पोहोचवायचा असेल, तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांनाच निवडून देणे गरजेचे आहे. घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून संपूर्ण पॅनलला बहुमताने विजयी करा,असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

कष्टकरी संघाच्या या ठाम पाठिंब्यामुळे प्रभाग १६ मधील राजकीय वातावरण अधिक राष्ट्रवादीमय झाले असून, घड्याळाच्या टिक-टिकीत विजयाची चाहूल स्पष्टपणे ऐकू येत आहे.

या विश्वासपूर्ण पाठिंब्याबद्दल चारही उमेदवारांनी कष्टकरी संघासह उपस्थित सर्वांचे मनापासून आभार मानले.यावेळी बोलताना पॅनल प्रमुख व माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी भावनिक शब्दांत सांगितले, कष्टकरी, श्रमिक आणि सामान्य नागरिकांनी दाखवलेला हा विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. हा विश्वास कधीही तडा जाऊ देणार नाही. सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करत प्रभाग १६ चा सर्वांगीण विकास साधण्याची आम्ही ग्वाही देतो.

माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलला प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. विविध सामाजिक संघटना, कष्टकरी संघटना आणि मेहनती कामगारांचा मिळणारा पाठिंबा पाहता, आमच्या पॅनलमधील सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे. हा विजय केवळ आमचा नसून, प्रभाग १६ मधील प्रत्येक कष्टकरी, प्रत्येक सामान्य नागरिकाचा विजय असेल.
मोरेश्वर भोंडवे पॅनल प्रमुख

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 27
Tags: #election #Ncp #rashtrwadi #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: ताथवडेमध्ये भाजप पॅनलचा जोरदार प्रचार; पवार, नवले आणि स्थानिकांचे बळ भाजपसोबत
Next: मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या विश्वासाला अजितदादांची ग्वाही, संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.