


मुंबई | प्रतिनिधी, ता. ९: पिंपरी-चिंचवड येथे काल अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या बैठकीत मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला अधिकृत पाठिंबा देण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मुस्लिम समाजाच्या न्याय्य हक्क, सामाजिक सुरक्षा, शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायमस्वरूपी कटिबद्ध राहील, असा ठाम शब्द दिला.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून वाटचाल करणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा त्यांनी नेहमीच सेक्युलर विचारधारेतून काम केले असून मुस्लिम समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी ते कायम उभे राहिले आहेत. प्रत्येक अडचणीच्या काळात मुस्लिम समाजाची साथ दिली आहे. समाजावर संकट आले असताना ते केवळ बोलघेवडे न राहता प्रत्यक्ष कृतीतून पाठीशी उभे राहिले, अशी भूमिका संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी भूमिका स्पष्ट केली.

याच विश्वासाच्या आणि अनुभवाच्या आधारावर मुस्लिम समाजाने पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सारंग यांनी सांगितले..
या बैठकीस मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
