


गवळीनगर प्रभागातील राष्ट्रप्रेमनगर या भागातील नागरिकांनी मानले आभार

पिंपरी चिंचवड, ता. ८ डिसेंबर : (टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड) राष्ट्रप्रेम नगर मधील जुन्या ड्रेनेज लाईन बऱ्याच महिन्यांपासून निकामी झाल्या होत्या. ड्रेनेजचे घाण व दुर्गंधी युक्त पाणी नागरिकांच्या घराच्या भोवती जमा होत होते. पिण्याच्या पाण्यामध्ये अक्षरशः दुर्गंधीयुक्त मिश्रित पाणी येत असल्याने नागरिकांनी ही समस्या प्रामुख्यांने सोडवण्याची मागणी नगरसेविका प्रियांका ताई बारसे यांच्याकडे केली होती.
राष्ट्रप्रेम नगर भागात ड्रेनेजच्या गळतीमुळे भयानक दुर्गंधी पसरली होती. नागरिकांच्या वेळोवेळी या ठिकाणी तक्रारी येत होत्या. अक्षरशः नागरिक आजारी पडून दवाखान्यात पैसे घालून वैतागले होते. पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिक्स होऊन लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत दुष्परिणाम दिसून आला. परिणामी, या समस्या सोडवण्यासाठी ताईने अधिक लक्ष दिले. त्याचबरोबर नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या इतरही समस्या जाणून घेतल्या.
नागरिकांच्या या सर्व अडचणी लक्षात घेऊन प्रथम पाण्याची नवीन पाइपलाईन या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. तसेच, ड्रेनेज लाईनचे नव्याने काम सुरू केल्याने सर्वांना पाण्याचे नवीन नळजोड देण्यात यश आले आहे. सुमारे ३० बाधित घरे या समस्येतून सुटण्यास मदत होईल.
सदर ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण होण्यासाठी दोन तीन आठवडे कालावधी लागणार आहे. चेंबर प्लास्टर झाल्यानंतर लगेचच काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणार आहे, या कामासाठी जलनिसारण विभागाच्या अभियंता प्रियांका म्हस्के यांचे सहकार्य मिळाले, अशी माहिती प्रियांका बारसे , माजी नगरसेविका यांनी दिली.
खरंतर गेल्या सहा-सात महिन्यापासून नागरिकांच्या या तक्रारी येत होत्या. परंतु , काही नागरिकांचे बांधकाम या ड्रेनेज लाईनला अडसर ठरत होते. ते बांधकाम काढल्यानंतर हे काम सुरू करण्यात आले. सिमेंटचे पाईप प्राधान्याने या ठिकाणी टाकण्याच्या सूचना केल्या आहेत .
- प्रियांका बारसे, माजी नगरसेविका, प्रभाग क्र.५, भोसरी

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
