Skip to content
02/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • मिशन- PCMC : भोसरी विधानसभेत भाजपा ‘ऑन फायर मोड’वर !
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

मिशन- PCMC : भोसरी विधानसभेत भाजपा ‘ऑन फायर मोड’वर !

suwarna gaware 08/12/2025
75024f79-80c3-457d-a535-93633fa3db87
Spread the love
  • कार्यकर्तेच ठरवणार, महापालिका निवडणुकीचे सक्षम उमेदवार
  • मतदार संघातील 12 प्रभागांत एकाच वेळी प्रभाग कमिटीच्या बैठका

पिंपरी-चिंचवड। प्रतिनिधी, ता.८: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आगामी निवडणुकीच्या निमित्ताने भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपा ‘ऑन फायर मोड’ वर आहे. पक्षाकडून इच्छुक अर्ज वितरण सुरू झाल्यानंतर आज एकाच वेळी मतदार संघातील 12 प्रभागांमध्ये पक्षाचे इच्छुक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभाग कमिटीची बैठक घेण्यात आली.

विशेष म्हणजे, कमिटी सदस्यांकडून उमेदवार कोण असावा? याबाबत गोपनीय अभिप्राय घेतले आहेत. त्यामुळे भाजपाचे सक्रीय कार्यकर्तेच महापालिका निवडणुकीचे सक्षम उमेदवार ठरवतील, असा संदेश यानिमित्ताने दिला आहे.

भाजपाचे नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रभागनिहाय भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

दरम्यान, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकीसाठी पक्षाची संघटनात्मक यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. बैठकी दरम्यान प्रभागातील संभाव्य उमेदवारांविषयी गोपनीय अभिप्राय घेण्यात आला.

संपूर्ण पॅनेल विजयी होण्यासाठी आवश्यक सूचना, अपेक्षा व सामाजिक समीकरणांचा अभ्यासही करण्यात आला. हिवाळी अधिवेशनानंतर प्रभागस्तरीय कोअर कमिटीसोबत प्रत्यक्ष संवाद साधत पुढील रणनीती अंतिम केली जाणार आहे.

भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. एका जागेसाठी किमान चार-पाच इच्छुक आहेत. तिकीट एकाच उमेदवाराला मिळणार आहे. त्यामुळे संभाव्य नाराजी टाळणे आणि एकजुटीने ‘कमळ’ चिन्हाचा प्रचार करावा. उमेदवारी किंवा प्रभागातील कारणांवरुन मतभेद असतील, तर त्यावर सामंजस्याने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी आमदार लांडगे यांचे काम प्रभावीपणे केले. त्यांना 2017 च्या महापालिका निवडणुकीत संधी देण्यात आली. त्यानंतर महापालिका सत्ताकाळात अनेक प्रमाणिक समर्थकांनी मानाची पदेही देण्यात आली.

त्यानंतर 2019 आणि 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचे काम निष्ठेने करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत संधी देण्याची भूमिका आहे. त्या अनुशंगाने कार्यकर्त्यांमधून उमेदवार निश्चित व्हावा, अशी सर्वसमावेशक भूमिका आमदार लांडगे यांनी घेतली आहे, अशी माहिती सरचिटणीस विकास डोळस यांनी दिली.


प्रत्येक घरापर्यंत भाजपा आणि कमळ चिन्ह पोहोचवण्यासाठी संघटनात्मक कार्याला आम्ही गती दिली आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकजुटीने, ‘‘कमळ हाच उमेदवार’’ या भावनेने काम करीत आहेत. भाजपाच्या प्रभागनिहाय मजबूत रचना, समन्वयक प्रणाली आणि सूक्ष्म मोर्चेबांधणीच्या बळावर 2014, 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही सलग विजय मिळवला. 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीतही ही यंत्रणा निर्णायक ठरली आहे. त्यामुळे या महापालिका निवडणुकीतसुद्धा प्रभाग यंत्रणा गतीमान केली आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच प्रभाग कमिटी सदस्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधणार आहे.

  • महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 30
Tags: #आमदार महेश लांडगे #बीजेपी Pcmc Pimpri and Chinchwad politics भोसरी

Continue Reading

Previous: रुपीनगर मध्ये दत्तजयंती उत्साहात, दत्त मंदिराचे 40 वे वर्ष
Next: सात महिन्यांपासून रखडेलल्या ड्रेनेज कामाला माजी नगरसेविका प्रियांका बारसे यांच्या प्रयत्नामधून अखेर यश

Related Stories

271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 1

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 2

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 3

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

27/02/2026
अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’! 8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce 5

अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

24/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप
  • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी
  • अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.