


पिंपरी चिंचवड, ता. ६: प्रियदर्शनी स्कूल, मोशी यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त एक आकर्षक संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. प्रियदर्शनी समूहातील एकूण ९ शाळांनी (प्रियदर्शनी समूहाच्या विविध शाखा )या स्पर्धेत सहभाग घेतला.

इयत्ता ५ ते १० च्या विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभागी होऊन भारतीय संविधान, मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि आपल्या लोकशाही संरचनेविषयीचे ज्ञान प्रदर्शित केले.
या प्रश्नमंजुषेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये, नागरिकत्व आणि लोकशाही जबाबदाऱ्या यांविषयी जागरूकता निर्माण झाली. या स्पर्धेत प्रियदर्शनी स्कूल ,शिवाजीनगर शाखा विजेती ठरली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत समृद्ध आणि शैक्षणिक ठरला, तसेच संविधानाबद्दल आदर आणि त्याचे पालन करण्याची प्रेरणा दिली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रीम कोर्ट प्रॅक्टिशनर अॅडवोकेट गीताांजली कदाते होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधान आणि विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन केले

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
