


पिंपरी चिंचवड, ता. ५: अलीकडची मुलं मोबाईलमध्ये अधिक रमतात. परंतु वाचनाने माणूस घडतो. त्यामुळे वाचनाचा संस्कार रुजायला हवा. वाचनाचा संस्कार रुजणे ही काळाची गरज आहे. मूल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाचन संस्कृती रुजायला हवी. त्यासाठी सर्व स्तरातून विशेष प्रयत्न व्हायला हवेत. असं लेखक विजय शेंडगे म्हणाले.

मुलाचे भारतीय असलेले परंतु दुबईत वास्तव्यास विजय माने यांच्या वतीने विजय शेंडगे लिखित नको असला बाप या कादंबरीच्या पाच प्रती शाळेला भेट देण्यात आल्या. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमास शाळेचे कार्याध्यक्ष संजय शेंडगे, विजय माने, शाळेच्या मुख्याध्यापक थोरात मॅडम, लेखक विजय शेंडगे उपस्थित होते.
मुलांनी स्वतःला उत्तम शिस्त लावून घ्यायला हवी. शिस्त ही उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. असं विजय माने त्यांच्या मनोगतात म्हणाले.
शाळेचे कार्याध्यक्ष संजय शेंडगे म्हणाले, अभ्यास आणि अवांतर वाचन ही मुलांच्या आयुष्याची आणि भवितव्याची प्राथमिक गरज आहे.
शाळेच्या माहेश्वरी सभागृहात पार पपडलेल्या या सभागृहाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. थोरात मॅडम यांनी केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
