


पिंपळे गुरव,ता. २०: भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त जागृती स्कूलमध्ये शालकरी विद्यार्थ्यांनी भाषन करत स्व इंदिरा गांधी यांच्याबद्दल विद्यार्थ्यांनी सांगीतले इंदिरा गांधींनी देशाती केलेली प्रगती यावर देश मोठा आहे असे भाषण केले व प्रतिक नवले यांनी अभार व्यक्त केले.

अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्वक मानवंदना देत पुष्पहार अर्पण केले. देशासाठी कार्य करताना दाखवलेली त्यांची जिद्द, दूरदृष्टी आणि नेतृत्वगुण यांची आठवण करून देत हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमास संदेश नवले (जागृती धर्माधिकारी), स्नेहांकिता शिंदे, मिनाक्षी नरोलिया, शुभांगी कदम आणि जयश्री जगताप उपस्थित होते. यांनी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा घेऊन जीवनमूल्ये जोपासण्याचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी इंग्रजी व मराठी भाषेत प्रभावी भाषणे सादर केली. काही विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधींच्या कार्याचा आढावा घेत “महिला नेतृत्वाचे सामर्थ्य”, “राष्ट्रहितासाठी कठोर निर्णयांची गरज”, “शिक्षण आणि शिस्त यांचे महत्त्व” यांसारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांची तयारी, सादरीकरण आणि देशप्रेमाची जाण याचे कौतुक केले. कार्यक्रमातून इंदिरा गांधींच्या जीवनचरित्रातून शिकण्यासारखे अनेक धडे विद्यार्थी मनात रुजविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला.
जागृती स्कूलचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाणीव, राष्ट्रीय भावना आणि नेतृत्वगुण विकसित करणारा ठरला.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
