


• ICMR–DHR च्या सहकार्याने आयोजित कार्यशाळेत जेनेटिक निदान, काऊन्सेलिंग आणि मॉलिक्युलर तंत्रांचे सखोल प्रशिक्षण.

• जन्मजात दोष आणि दुर्मीळ आजारांच्या व्यवस्थापनासाठी डॉक्टर व संशोधकांना अत्याधुनिक ज्ञान व कौशल्यांचे प्रशिक्षण
• जन्मदोष ओळख, जेनेटिक काऊन्सेलिंग तंत्रे आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेत कौशल्य विकसित करण्यावर भर
पुणे, १७ नोव्हेंबर २०२५: (टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड) डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे येथील बालरोग विभागाने दोन दिवसांची हॅण्ड्स-ऑन कार्यशाळा यशस्वीपणे आयोजित केली होती. या कार्यशाळेचा विषय मेडिकल जेनेटिक्स, बर्थ डिफेक्ट ओळख व जेनेटिक काऊन्सेलिंग स्ट्रॅटेजीज असा होता.
या कार्यक्रमाला भारत सरकारच्या आरोग्य संशोधन विभाग (DHR) – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), नवी दिल्ली यांचे सहकार्य लाभले होते. या कार्यशाळेसाठीचा निधी डॉ. प्रमिला मेनन आणि डॉ. स्नेहा सागरकर यांना आरोग्य संशोधन विभाग (DHR) – ICMR कडून प्रदान करण्यात आला होता.
जन्मजात दोष हे जागतिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर आव्हान राहिले असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर आजारपण व मृत्यूची शक्यता निर्माण होत होती. तपासणी, लवकर निदान आणि वेळेवर उपचार ही प्रतिबंधाची सर्वाधिक प्रभावी साधने असल्याचे अधोरेखित करण्यात आले. या कार्यशाळेत या सर्व प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यात आला होता, ज्यामुळे समुदायामध्ये आनुवंशिक आजारांचा बोजा कमी करण्याचा उद्देश साधला गेला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रमुख अतिथी डॉ. श्राबनी मुखर्जी, सायंटिस्ट G, ICMR–NIRRCH, मुंबई, तसेच डॉ. मंदाकिनी प्रधान, प्राध्यापक व विभागप्रमुख – मातृत्व व प्रजनन आरोग्य विभाग, SGPGIMS, लखनऊ यांचा समावेश होता. मुख्य अतिथी म्हणून डॉ. एन. जे. पवार, कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे उपस्थित होते.
डॉ. श्राबनी मुखर्जी यांनी ICMR च्या वैद्यकीय संशोधनातील योगदानावर प्रकाश टाकत भारतात आनुवंशिक संशोधनाची वाढती गरज स्पष्ट केली होती. डॉ. एन. जे. पवार यांनी जेनेटिक्स क्षेत्रातील सहयोगी संशोधन प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित केले होते. त्यानंतर डॉ. ए. रेखा, अधिष्ठाता यांनी मनोगत व्यक्त केले होते, तसेच डॉ. पी. वत्सलास्वामी, डायरेक्टर अकॅडेमिक्सयांनीही जीनशास्त्रावरील प्रभावी विवेचन केले होते.
कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक व विभागप्रमुख, बालरोग विभाग डॉ. शैलजा माने, डायरेक्टर ऑफ रिसर्च डॉ. श्रीकांत त्रिपाठी आणि ॲनॅटॉमी विभागाचेप्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. प्रीती सौंजे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यशाळेचे नेतृत्व डॉ. प्रमिला मेनन, प्राध्यापक व जेनेटिक क्लिनिक प्रमुख यांनी केले होते. त्यांनी उद्घाटनपर भाषण केले होते. तसेच डॉ. स्नेहा सागरकर, रिसर्च विभाग, यांनी वैज्ञानिक सत्रे आणि हॅण्ड्स-ऑनप्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून काम पाहिले होते.
भारतभरातील ICMR संस्थांमधील तसेच विविध राज्यांतील – महाराष्ट्र, केरळ, आसाम आणि तिरुवनंतपुरम – वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक, पीएच.डी. संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थी असे एकूण ४४ हून अधिक प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
वैज्ञानिक कार्यक्रमात मेडिकल जेनेटिक्स, जीनोमिक डायग्नॉस्टिक्स, प्रिनेटल व रिप्रोडक्टिव जेनेटिक्स, काऊन्सेलिंग तंत्रे तसेच मॉलिक्युलर आणि साइटोजेनेटिक पद्धतींवरील प्रात्यक्षिक प्रशिक्षण अशा व्यापक विषयांचा समावेश केला गेला होता. केस डिस्कशन, गटक्रियाकलाप आणि संवादात्मक कार्यशाळांमुळे सहभागींच्या ज्ञानवृद्धीसह नेटवर्किंग आणि आयडिया एक्स्चेंजची संधी मिळाली होती.
कार्यशाळेत आनुवंशिक निदान व काऊन्सेलिंगमधील नैतिक मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली होती तसेच भविष्यातील संशोधन सहकार्याचे मार्गही शोधण्यात आले होते.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे येथीलप्र-कुलपती माननीय डॉ. भाग्यश्री पी. पाटील, म्हणाल्या, “ही कार्यशाळासंशोधन, नवकल्पना आणि संवेदनाशील आरोग्यसेवा यांचे एकत्रीकरणकरण्याच्या आमच्या संस्थेच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब ठरली. डॉक्टर आणिसंशोधकांना जेनेटिक साक्षरता प्रदान करून आम्ही प्रतिबंधात्मक आरोग्यसेवाआणि आनुवंशिक आजारांच्या लवकर हस्तक्षेपाच्या दिशेने एक महत्त्वपूर्णपाऊल उचलले.”
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे यांचेविश्वस्त व खजिनदार माननीय डॉ. यशराज पी. पाटील यांनी सांगितले “डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात आम्ही बहुविषयक सहकार्याला प्रोत्साहनदेणाऱ्या उपक्रमांना नेहमीच ठामपणे पाठिंबा दिला आहे. ही कार्यशाळावैद्यकीय शिक्षण आणि संशोधन एकत्रित येऊन रुग्णसेवा व सार्वजनिकआरोग्य क्षेत्रात कसा परिवर्तनकारी प्रभाव निर्माण करू शकतात, याचे उत्तमउदाहरण ठरली.”
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे चे अधिष्ठाता डॉ. रेखा अर्कोट, यांनी सांगितले, “या कार्यशाळेनेशैक्षणिक शिक्षण आणि क्लिनिकल प्रॅक्टिस यांतील दरी प्रभावीपणे भरूनकाढली आणि वैद्यकीय व्यावसायिकांना जेनेटिक्सचे ज्ञान प्रत्यक्ष आरोग्यसेवेतलागू करण्यास तसेच त्यांच्या निदान व संशोधन कौशल्यांचा अधिक विकासकरण्यास सक्षम बनवले.”
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे चे डायरेक्टर अकॅडेमिक्स डॉ. पी. वत्सलास्वामी, यांनी सांगितले, “जेनेटिक्स हे पर्सनलाइज्ड मेडिसिनचे भविष्य आहे. या कार्यशाळेदरम्यानदिलेल्या हॅण्ड्स–ऑन प्रशिक्षणामुळे सहभागीांना मॉलिक्युलर सायन्स आणिक्लिनिकल केअर यांतील दरी भरून काढण्यास सक्षम झाले.”
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे च्या प्राध्यापक व विभागप्रमुख, बालरोग विभाग डॉ. शैलजा माने, म्हणाल्या, “या कार्यशाळेद्वारे आम्ही आरोग्यसेवा व्यावसायिकांमध्येजागरूकता, कौशल्य आणि सहकार्याची भावना विकसित करण्याचा प्रयत्नकेला. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जेनेटिक्सचा समावेश करणे हे जन्मजातदोषांचे लवकर निदान, प्रतिबंध आणि सुधारित व्यवस्थापनासाठी अत्यंतमहत्त्वाचे आहे.”
या कार्यशाळेमुळे आरोग्यसेवा व्यावसायिकांना विविध आनुवंशिक जन्मदोषआणि बालकांमधील दुर्मीळ आजारांविषयी सखोल समज प्राप्त झाली. तसेचपालकांना योग्य मार्गदर्शन, माहितीपूर्ण काऊन्सेलिंग आणि प्रभावित मुलांचेअधिक सहानुभूतीपूर्वक व कुशल हाताळणी करण्याची क्षमता विकसितझाली.
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्याबालरोग विभागात अत्याधुनिक जेनेटिक क्लिनिक उपलब्ध असून येथेसर्वसमावेशक आनुवंशिक तपासणी व काऊन्सेलिंग सेवा दिल्या जातात. प्रत्येक मंगळवारी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत तज्ञ डॉक्टरपालक व मुलांसाठी उपलब्ध असून गर्भधारणा पूर्वी व दरम्यान योग्य मार्गदर्शन, लवकर निदान, प्रतिबंध आणि आनुवंशिक आजारांचे व्यवस्थापन यासाठीमदत करतील.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
