


भोसरी, ता. १७: दमदार आमदार महेशदादा लांडगे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त कविता भोंगाळे युवा मंच व गायत्री मंचच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर तसेच रक्तदान शिबीर विदर्भ मित्र मंडळ भोसरी येथे उत्साहात संपन्न झाले. स्थानिक नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.


कामगार नेते श्री. सचिनभैय्या लांडगे, मा. नगरसेवक श्री सागर गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय हडपसर येथील नेत्रतज्ञ डॉक्टरांच्या टीमने नागरिकांची तपासणी करून आवश्यक रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड केली. भोसरी मधील शेकडो ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा लाभ झाला.
रक्तदान शिबिरातही युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी सर्व रक्तदात्यास आयोजकांकडून एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. गोळा झालेले रक्त स्थानिक रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आले.
कार्यक्रमाला भाजपा भोसरी मंडलाध्यक्ष श्री. अमोल डोळस, सामाजिक कार्यकर्ते उद्योजक श्री विनायकराव भोंगाळे,विदर्भ मित्र मंडळ अध्यक्ष श्री.अशोक भगत,भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री रवींद्र नांदुरकर, भारतीय माथाडी कामगार जनरल संघटना पुणे जिल्हाध्यक्ष श्री. विजयभाऊ भोसुरे, विदर्भ मित्र मंडळ उपाध्यक्ष श्री सचिन आसोले, कार्याध्यक्ष श्री अनिल धामणदे , सचिव श्री. प्रकाश ढिककर, मा. अध्यक्ष हरिभाऊ तांदळे, श्री.सुधाकर वसे, श्री.रघुनाथ पाटील, युवा नेते रणजीत गव्हाणे,सामाजिक कार्यकर्ते श्री.गजानन रहाणे, श्री.पांडुरंग कातोरे
श्री.सुदाम मुंडे प्रभाग क्रमांक पाच भाजपा महिला अध्यक्षा सौ. स्वातीताई शिर्के, उपाध्यक्ष सौ.मनीषाताई गंगणे, उद्योजक श्री.शंकर कापसे, सौ. द्रोपदा काटे, सौ.उज्वलाताई पडवळ, सौ.जया सांगळुतकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा उपक्रमांमुळे जनतेत समाधानाचे वातावरण होते.
आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
