


पिंपरी चिंचवड, ता. ३०: दिनांक 27 सप्टेंबर रोजी मा. वि.केशवनगर भाग, शाळा रावेत आणि रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पुरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा म्हणून सध्याची महाराष्ट्रातील महापूरग्रस्त परिस्थितीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये यांच्यासह अहिल्यानगर सोलापूर जिल्ह्यात नदीने पुराची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठचे गावासह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाल्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनातील आवश्यक असलेल्या वस्तूही नाहीत.
शाळेतील विद्यार्थ्यांचे दप्तरे वह्या पुस्तके सर्वकाही नदीने वाहून नेले आहे यामुळे या सर्वांचे होत असलेले हाल बेहाल आर्थिक, जीवित आणि वित्त हानी झालेली पाहून रावेत भाग शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षण घेणाऱ्या बंधू-भगिनीसाठी व भारत देशाच्या कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांसाठी एखादा एक हात मदतीचा म्हणून दया भावनेतून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेले अन्नधान्य ,कपडे इ. जीवनावश्यक वस्तूची मदत देण्याचे ठेवले . त्यांना जमेल तशा वस्तू ज्वारी बाजरी गहू कडधान्य डाळी मसाले साखर अशा जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात संकलित करून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीला सपोर्ट केल्या.
महाराष्ट्रातील सततच्या महापुरामुळे महाराष्ट्रातील अनेक गावे पाण्याखाली गेली असून शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. तसेच पुराच्या पाण्यात शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. संसारोपयोगी साहित्य आणि अन्नधान्य वाहून गेले आहे. त्यांना एक मदतीचा हात म्हणून मा. वि. केशवनगर आणि रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी या दोन संस्थांनी मदतीचा हात दिलेला आहे.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी हे आव्हान केले आहे तू आपल्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी गोपालकांनी या पूरग्रस्त बांधवांना सगळं हाताने मदत करावी. संकटात सापडलेल्या अन्नदातेला सध्या मदत करणे हेच आपले कर्तव्य आहे. असे मत संकलनाच्या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
यावेळी रोटरी क्लब वाल्हेवाडीचे माजी अध्यक्ष रो. गणेश बोरा ,रो. जगदाळे गोविंद ,माजी सचिव रामेश्वर पवार ,रो. सुभाष वाल्हेकर, सचिव रो. वसंत ढवळे , रो.प्रोजेक्ट डायरेक्टर संदीप भालके, ज्ञानेश्वर भंडारी त्यांचे वडिल भंडारी काका ,रो.भोंडवे दीपक तसेच मा.वि. केशवनगर, भाग शाळा, रावेतचे प्रमुख श्री.पवार आर.एस श्री. वानखेडे महेंद्र,श्रीम. रोकडे पूजा, श्रीम. उके प्रज्ञा, श्रीम. शेख आरसिया आणि शाळेतील मुले मुली उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
