


पिंपरी चिंचवड, ता. ३०: जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय व श्रीमती के जे गुप्ता जुनिअर कॉलेज च्या 5 विद्यार्थ्यांचे विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये विद्यालय व ज्यू कॉलेज च्या 5 विद्यार्थीनी उत्तम यश संपादन केले . त्यांची विभागीय स्पर्धे करता निवड झाली आहे त्याबद्दल संस्थेच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
विभागीय स्पर्धेकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे…
ओपन साईट एअर रायफल प्रकार…
1) चि सार्थक रामदास थोरात..
( श्रीम के जे गुप्ता ज्यू कॉलेज)
19 वर्ष मुले… द्वितीय क्रमांक
2) कु गिरीजा शशिकांत माने..
(श्रीम के जे गुप्ता ज्यू कॉलेज )
19 वर्ष मुली… तृतीय क्रमांक
3) कु गायत्री शशिकांत निकम..
(श्री शिवछत्रपती शिवाजी राजे )
19 वर्ष मुली.. प्रथम क्रमांक
4) चि श्रवण संभाजी मोरे.
(श्री शिवछत्रपती शिवाजी राजे)
17 वर्ष मुले.. तृतीय क्रमांक
एअर पिस्तोल प्रकार..
5) कु रितिका निलेश आहेर.
(श्री शिवछत्रपती शिवाजी राजे )
17 वर्ष मुली.. द्वितीय क्रमांक
संपादित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा जगदीश दादा जाधव, सचिव मा संजय भाऊ जाधव, संचालक मा विजय जाधव, उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी अभिनंदन केले व पुढील विभागीय स्पर्ध करिता करता मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळाराम पाटील पर्यवेक्षक श्री दत्तात्रय भालेराव, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका सौ पुष्पा शिंदे उप मुख्याध्यापिका सौ सुषमा संधान, पर्यवेक्षक श्री साहेबराव देवरे, कोअर कमिटी सदस्य,सौ मनीषा जाधव,सौ छाया ओव्हाळ, क्रीडा शिक्षक शब्बीर मोमीन, अमोल पाटील सौ सपना सावेडकर, श्री अनिल मुंडे इ शिक्षक उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
