


पिंपरी चिंचवड, ता. १: मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती पाहून पिंपरी चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना, सामाजिक संघटनांना, राजकीय नेत्यांना,व्यापारी,व्यावसायिक,मोठे उद्योजक व नोकरदार या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की, मराठवाड्यामध्ये पूर परिस्थितीमुळे मोठे संकट निर्माण झालेले आहे.

त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला पूरग्रस्तांना एक हात मदतीचा या संकल्पनेतून ज्या भागांमध्ये अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे आणि पाणी कमी झाल्यानंतर उद्भवणारी रोगराईची परिस्थिती यांचा विचार करता अनेक शेतकरी बांधवांचे जनजीवन विस्कळीत होऊन त्यांचे ईतर ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे .
अनेक गावांमध्ये 5 ते 6 दिवसापासून पाणी साठलेले आहे वीज पुरवठा खंडित आहे, संपर्क तुटलेला आहे,शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, शेतकरी व जनावरे पाण्यात वाहून गेले आहेत.
अशा सर्वांना माणुसकीच्या नात्याने पूर्वी प्रमाणे याही वेळी शेतकऱ्यांच्या संकटकाळात हातभार लावण्यासाठी आपल्या पिंपरी चिंचवड शहरातून आपण शालेय साहित्य,बिस्कीट, पेस्ट, तेल, साबण, किराणा माल,खाद्यपदार्थ, धान्य,कडधान्य,सॅनिटरी नॅपकिन,टॉवेल, ब्लॅंकेट, चादर, मॅट, फळे, ड्रायफ्रूट, अंगावरची कापडे, औषधे या सारख्या अनेक वस्तूंची जशी जमेल तशी व जेवढी जमेल तेवढी मदत करणार आहोत, तुम्ही तुमच्या गावाच्या,स्वतःच्या किंवा संस्थेच्या वतीने स्वतः जाऊन त्या ठिकाणी मदत वाटप करू शकता किंवा तुम्हाला जायला जमत नसेल तर तुम्ही जी मदत करणार आहात ती आमच्याकडे वस्तू स्वरूपात जमा करावी.
आम्ही ती मदत पुढील 4 ते 5 दिवसात पूरग्रस्त गावात घेऊन जाऊ व त्या ठिकाणी वाटप करू असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
