


पिंपरी चिंचवड, ता. २९: प्रभाग क्रमांक 14 मधील काळभोर नगर, मोहन नगर, आकुर्डी चिंचवड स्टेशन, रामनगर आयशरम सोसायटी शुभ श्री सोसायटी महात्मा फुले , नगर साईबाबा नगर खंडोबा माळखडी मशीन या भागातील भारतीय जनता पक्षाचे सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व प्रमुख कार्यकर्ते यांची अत्यंत महत्त्वाची बैठक सीजन हॉल काळभोर नगर या ठिकाणी पार पडली.

प्रभागातील माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे 35 वर्षापासून निष्ठावंतपणे काम करत असलेले जुने अनुभवी वरिष्ठ नेते राजाभाऊ दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीमध्ये प्रभागातील कैलासभाऊ कुटे आणि गणेशभाऊ लंगोटे या दोन प्रमुख नेत्यांसह मंडल अध्यक्ष धरम वाघमारे, सर्वांना एकत्रित ठेवण्यासाठी प्रमुख भुमिका बजावणारे दिलीप महाजन तसेच आगामी महापालिकेतील निवडणुकी साठी प्रभाग 14 मधून इच्छुक असलेले श्री चेतन बेंद्रे, श्री सचिन बेंद्रे यांच्यासह या प्रभागातील सर्व बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख तसेच सर्व महत्वाचे प्रमुख कार्यकर्ते आदी सर्वजण उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सर्वांनी एक दिशेने मंडल अध्यक्ष धरम वाघमारे आणि प्रभागातील सर्वांशी संवाद साधणारे दिलीप महाजन यांच्या सर्वांशी चर्चा करून ठरलेल्या नियोजना प्रमाणेच प्रभागात काम करण्याचे ठरविण्यात आले. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या नात्याने काम करत असताना सर्वांनी मी म्हणून नाही तर आपण म्हणून संपूर्ण प्रभागात काम करायचे आहे. असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
सर्व इच्छुक उमेदवार आणि प्रभागातील कोअर ग्रुप यांच्या मध्ये झालेला निर्णय सर्वांसाठीच बंधनकारक असणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडून दिलेले सर्व कार्यक्रम त्याचबरोबर प्रभागाच्या कोअर टीमने ठरविलेले सर्व कार्यक्रम एकत्रित पणे एका दिशेने करायचे ठरविण्यात आले आहे.
सदर बैठकीमध्ये राजाभाऊ दुर्गे, कैलासभाऊ कुटे, गणेशभाऊ लंगोटे, चेतनजी बेंद्रे, सचिनजी बंदी या सर्व प्रमुखांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्त्यांमधील काहींनी अत्यंत महत्वाच्या सूचना देखील केल्या. शेवटी प्रभागातील जुने कार्यकर्ते नंदू भोगले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सदर बैठकीचा समारोप करण्यात आला.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
