Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • लेखा विभागातील मालिद्यामुळे कर्मचाऱ्यांना सुटेना खुर्च्या..
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लेखा विभागातील मालिद्यामुळे कर्मचाऱ्यांना सुटेना खुर्च्या..

suwarna gaware 27/09/2025
Official_Logo_of_PCMC
Spread the love

पिंपरी चिंचवड महापालिकेतील लेखा विभागातील मुख्य लिपिक आणि इतर कर्मचारी यांना प्रशासनाचे अभय..

मुख्यमंत्री कार्यालयाकडून तक्रारीवर कारवाई करण्याच्या आदेशाला महानगरपालिका आयुक्ताकडून केराची टोपली

पिंपरी चिंचवड, ता. २७: पिंपरी चिंचवड महानगरपालिका लेखा विभागातील गैरव्यवहार अनेक वर्षापासून या ना त्या कारणाने चर्चेत आहेत. लेखा विभागात गेल्या कित्येक वर्षापासून अनेक कर्मचारी एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामध्ये विशेष म्हणजे मुख्य लिपिक हा गेली ८ वर्षांपासून येथेच कार्यरत आहे. तसेच यासोबत लिपिक, कर्मचारी, शिपाई यांचा भरणा आहे. कारण असे की, लेखा विभागातील अधिकाऱ्यांना भ्रष्ट कनिष्ठ कर्मचाऱ्यांना हाताशी धरून फेरफार करणे अधिक सोपे व सोयीस्कर होत असल्याचे त्यांच्या खुर्च्या टिकून असल्याचे दिसून आले आहे.

दिनांक ०८.०८.२०२५ १९.०९.२०२५ २३.०९.२०२५ आणि २४.०९.२०२५ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इ मेल च्या माध्यमातून लेखा विभागातील तक्रार दाखल झाली होती. सदर तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्री कार्यालय यांनी दिनांक ११.०८.२०२५ , १९.०९.२०२५ , ला २३.०९.२५ आणि २४.०९.२०२५ अशा अनेक वेळी संबंधित पत्रावर योग्य ती कार्यवाही चौकशी करण्याची सूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांना देण्यात आल्या होत्या. तरी देखील आयुक्त शेखर सिंग यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवली.

नुकत्याच महापालिकेत एकूण २५० बदल्या झाल्या. परंतु, लेखा विभागाचा त्यात समावेश नाही. उलट लेखा विभागात ११ नवीन कर्मचारी यांची बदली करण्यात आली. लेखा विभागातून कोणाची बदली झालीच नाही. फक्त २ कर्मचारी यांची पदोनत्तीने बदली झाली.बाकी अतिरिक्त ९ कर्मचारी लेखा मध्ये सध्याच्या बदली आदेशानुसार भरले गेले आहेत. नियमानुसार बदली पात्र असलेले लेखा विभागाचे कर्मचारी जसे की वरिष्ठ लिपिक आणि इतर बदलले गेलेच नाहीत.शासकीय नियम डावलून ५ वर्षाहून अधिक काळ लेखा विभागात काम करणारे काही कर्मचारी विशेषत वरिष्ठ लिपिक जो गेली ८ वर्षापासून येथेच आहे आणि त्यासोबतच असे काही कर्मचारी जे पदोन्नतीने बदली होऊन सुद्धा एकच ठिकाणी एकाच पदाचा कारभार पाहत आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या बदली करण्याबाबत आयुक्त आणि सामान्य प्रशासन विभाग चालढकल करीत आहे.

शहराची वाटचाल स्मार्टसिटी कडे गेली. आता प्रशासकीय राजवटीत तर पिंपरी चिंचवड गतिशील प्रशासन , आरोग्य सेवाकरिता अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. पण दिनांक ३१ जुलै रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एक कर्मचारी एका व्यक्तिकडून पैसे घेण्याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. लेखा विभागातील सदर व्हिडिओ असून यामुळे महानगरपालिकेतील चुकीच्या कामाबाबत शहरात चर्चा सुरू आहे.

प्रशासकीय राजवटीत भ्रष्टाचार…

आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना अनेक पुरस्कार मिळाले. गतिमान आणि भ्रष्ट कारभार विरहित प्रशासन असा डंका आयुक्त यांच्या मार्फत वाजविण्यात आला. आयुक्त शेखर सिंह यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करण्याचे आश्वासन दिलेले होते. प्रशासकीय राजवटीत अनेक चुकीच्या गोष्टी घडत असून वाढीव दराच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका लेखा विभागात अशा गोष्टी नेहमीच घडत असतात. मनपाचे काम करणाऱ्या ठेकेदारांची देयके काढण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. त्यामुळे येथे नेहमीच ठेकदार यांची वर्दळ असते.

या विभागात वरिष्ठ लिपिक , शिपाई कॉम्पुटर ऑपरेटर तसेच कंत्राटी कर्मचारी हे अनेक वर्षापासून येथे कार्यरत असल्याने त्यांना कोणाचेही भय नाही आहे. आपल्या शासनाचा भाग असणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका लेखा विभागात पैसे घेऊन कामे केले जातात एकही बिल विना पैशाचे पास केले जात नाही. शिपायापासून ते बिल मंजुरीचा चेक देणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच चिरीमिरी पैसे घेतात आणि हे सगळं सगळ्यांना माहिती असून सगळे गप्प आहेत.
….


स्वच्छ आणि पारदर्शक कारभार होण्यासाठी लेखा विभागातील ५ वर्षाहून अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाईचे अथवा त्यांची बदली करण्याचे आदेश त्वरीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून देण्यात यावे. शासकीय नियमानुसार एक अधिकारी अथवा कर्मचारी ५ वर्षाहून जास्त काळ एकच ठिकाणी कार्यरत राहू शकत नाही.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका लेखा विभागात वरिष्ट लिपिक, लिपिक , शिपाई आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून येथेच काम करतात. विशेष बाब म्हणजे लेखा विभागातील महिला कर्मचारी सुध्दा आर्थिक देवाणघेवाण करतात. अशा चुकीच्या प्रकारातून अशा घटना घडत आहे . आतापर्यंत ३ वेळा मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश येऊनही त्यावर कार्यवाही नाही.

  • राहुल कोल्हटकर , करदाता सामान्य नागरिक

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 84
Tags: #account #curroption #lekhavibhag #rahul kolhatkar #shekhar singh Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: अन्न पदार्थ विक्रेत्यांच्या प्रशिक्षणास फेरीवाल्यांचा प्रचंड प्रतिसाद
Next: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाचे चिंचवड येथे आंदोलन

Related Stories

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 1

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 2

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 3

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 4

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026
अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा 061d33f8-cf6d-4587-af21-29364f24b0ff 5

अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

30/08/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
  • अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.