


पिंपरी चिंचवड, ता. ११: पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक सहकारी पतसंस्थेच्या २०२३-२०२८ या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संचालकांमधुन दिंनाक ७/८/२०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळ सभेत पतसंस्थेचे चेअरमनपदी – श्री. शिवाजी येळवंडे, व्हा. चेअरमनपदी श्री. ज्ञानेश्वर शिंदे, सेक्रेटरीपदी, श्री विश्वनाथ लांडगे व खजिनदारपदी – श्री अभिषेक फुगे यांची निवड मा. पंकज राऊत निवडणुक निर्णय अधिकारी, तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर १ यांचे अध्यक्षतेखाली व पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मा. शशिकांत उर्फ बबनराव झिजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने करण्यात आली.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी व विदयमान संचालक यांनी मा. अध्यक्ष श्री शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार हा विनम्र आणि तत्पर सेवा व पारदर्शक व्यवहार व्यवस्थित रित्या चालविण्याचा संकल्प केला आहे. व सभासदांना बचतीच्या सवयी लागण्यासाठी ठेवीवर जास्तीत जास्त ९% व्याज व कन्यादान ठेवींवर १०% ते १०.५०% व्याजदर करुन संस्था स्वभांडवलावर उभी करणेचे धोरण ठरविले आहे.
तसेच सभासदांना कमीत कमी (११%) व्याज दराने कर्ज पुरवठा करून सभासदांची आर्थिक अडचणी दूर करणार आहोत. तसेच मा. अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे यांनी केलेली संस्थेची १६ वर्षापूवीर्ची वार्षिक ऊलाढाल रु.१७ कोटीच्या आसपास होती आता २१ वर्षात संस्थेची वार्षिक ऊलाढाल रु. २०३ कोटीच्या वर झाली आहे. व कर्ज मर्यादा रु. ५० हजारावून रु. २० लाखापर्यंत वाढविले असून त्वरीत मंजूर व गतिमान वितरण करत आहे.
त्याची थकबाकी ०.५०% इतकी आहे. यावरुन संस्थेची आर्थिक स्थिती पाहता संस्थेला सतत ‘अ’ वर्ग दर्जा मिळालेला आहे. संस्था स्थापनेपासून सलग ५० वर्ष नफा मिळवून नफ्यातून सभासदांना जास्तीत जास्त १४% / १२% लाभांश वाटप करत आहे. तसेच सभासदांना आरोग्याचे निदान त्वरीत लक्षात यावे करिता वैदयकिय किट वाटप केले आहे.
तसेच संस्थेच्या मयत सभासदांचे कर्ज माफ करणारी महाराष्ट्रातील पहिली पतसंस्था आहे. सतत सभासदांच्या हितासाठी व तत्पर सेवेसाठी सदैव आग्रही आहे. संस्थेच्या आर्थिक उलाढाली मध्ये अधिकाअधिक वाढ करणेचे व सभासदांच्या अडचणी दूर करणेचे संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाने एकविचाराने केला आहे.
यावेळी संस्थेचे विदयमान संचालकव माजी पदाधिकारी चारुशिला जोशी, सनी कदम, नथा मातेरे, भास्कर फडतरे, चंद्रकांत भोईर, विजय नलावडे, विजया कांबळे, विशाल भुजबळ, अनिल लखन, संदीप कापसे, कृष्णा पारगे, विजय मुंडे, वैभव देवकर, योगेश रानवडे, गणेश गवळी, युनुस पगडीवाले व संस्थेचे सल्लागार मनोज माछरे, नितीन समगीर, महादेव बोत्रे, दिंगबर चिंचवडे, लाला गाडे, संजय कापसे, मंगेश कलापुरे, उमेश बांदल, चंद्रशेखर गावडे, विशाल बाणेकर सूरज टिंगरे व नवनिर्वाचित सल्लागार किशोर आठवाल, गौतम पायाळ, भाऊसाहेब शेलार, राकेश चव्हाण, गौतम भालेराव व तसेच महासंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️