Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड शहरात आंबेडकरी जनतेचा आक्रोश: उपसभापती अण्णासाहेब बनसोडे यांच्या अवमानाविरुद्ध तीव्र निषेध मोर्चा
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड शहरात आंबेडकरी जनतेचा आक्रोश: उपसभापती अण्णासाहेब बनसोडे यांच्या अवमानाविरुद्ध तीव्र निषेध मोर्चा

suwarna gaware 11/08/2025
c99a23de-9c37-4a88-ad15-e650439f2254
Spread the love

पिंपरी चिंचवड, ता. ११ : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा. अण्णासाहेब बनसोडे यांचा आयुक्तांकडून झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले.

या मोर्चात 5000 पेक्षा अधिक आंबेडकरी कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित नागरिक सहभागी झाले. मोर्चाची सुरुवात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यापासून झाली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभेने त्याची सांगता झाली.

आयुक्तांवर सात दिवसांत कारवाईचा इशारा
निषेध सभेत आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी एकमुखाने आयुक्तांवर सात दिवसांत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत कारवाई न झाल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला टाळा ठोकण्याचे आंदोलन तीव्र करण्याचा गर्भित इशारा देण्यात आला.

सभेचे अध्यक्षस्थान आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत यांनी भूषवले. यावेळी रिपब्लिकन चळवळीचे नेते सुरेश निकाळजे,कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे ,रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, ऑल इंडिया पॅंथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारी, पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, सोलापूर येथून आलेले दशरथ कसबे, संतोष निसर्गंध, धर्मपाल तंत्रपाळे, कुणाल वावळकर, प्रतीक कर्डक,अजित भाई शेख, बाळासाहेब रोकडे, विजय डोळस, संदिपान झोंबाडे, ज्ञानेश्वर कांबळे, गंगा धेंडे, सुप्रिया काटे, सिकंदर सूर्यवंशी, अंजना गायकवाड यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बनसोडे कुटुंबियांचा आभार
बनसोडे कुटुंबातर्फे सिद्धार्थ बनसोडे यांनी व्यासपीठावर उपस्थित राहून मोर्चेकरांचे आभार मानले. “आंबेडकरी जनतेने अण्णांसाठी दाखवलेले प्रेम आणि समर्थन आम्ही कधीही विसरणार नाही. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी कायम कटिबद्ध राहू,” असे त्यांनी भावनिक उद्गार काढले.

कायदेशीर कारवाईसाठी तक्रार
राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजय अवसरमल यांनी याप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाईसाठी पोलीस उपायुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला. मोर्चेकरांचे निवेदन पोलीस उपायुक्त श्री. संदिप आटोळे, सह्या पोलीस आयुक्त श्री. हिरे साहेब यांनी स्वीकारले.

आंबेडकरी चळवळीचा भावनिक आणि कायदेशीर लढा
हा मोर्चा आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी भावनिक आणि कायदेशीर पद्धतीने आयोजित केला होता. समाजातील अन्याय आणि अपमानाविरुद्ध एकजुटीने लढण्याचा संदेश या मोर्चाने दिला. आंबेडकरी विचारधारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांवर आधारित हा लढा पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक न्यायाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 180
Tags: #baba kamble #morcha #political #shekhar singh Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: क्रांतिकारक हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना अभिवादन; शब्दधन काव्यमंचाचे देशभक्तिपर क्रांती कविसंमेलन
Next: पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक सहकारी पतसंस्था संचालक निवडणूक जाहीर

Related Stories

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 1

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 2

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 3

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 4

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026
अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा 061d33f8-cf6d-4587-af21-29364f24b0ff 5

अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

30/08/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
  • अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.