


पिंपरी, दि.१- मृदंगालय पखावज अकादमीतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त एक सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शनिवार, २ ऑगस्ट रोजी सायं. ४.३० वाजता निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या मनोहर वाढोकर सभागृहात होणार आहे.

कार्यक्रमात आदित्य शिंगाडे, आर्यन सोनवणे, दुर्वाक चौधरी, संदेश चव्हाण, सिद्धी येवले, रामकृष्ण येवले यांची सादरीकरण, तसेच श्री. राजन साटम, महेश परब, विवेक सावंत, गौरेश परब यांचे सोलोवादन होणार आहे. भावेश खोसे यांचे शास्त्रीय गायन तर अनुजा बोरुडे-शिंदे यांचे एकल पखावज वादन यावेळी होणार आहे.
सर्व कलाकारांना हार्मोनियमवर साथसंगत चंद्रकला खोसे व श्री. हरिभाऊ असतकर देणार आहेत तर बिभीषण खोसे हे गायन आणि अजित किंबहुणे हे तबल्यावर साथसंगत देणार आहेत.
या कार्यक्रमास सर्वांना प्रवेश मोफत असून सर्व संगीतप्रेमींनी या सांगीतिक पर्वणीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय पखवाज वादक अनुजा बोरुडे – शिंदे यांनी सर्वांना केले आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️