


पिंपरी चिंचवड, ता. २७: शिवसेना काळेवाडी विभागाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक आरोग्य सेविका तसेच दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता.

या कार्यक्रमास शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातूर्डेकर उप जिल्हा प्रमुख दस्तगीर मणियार संवाद व्यासपीठाचे हरीश आप्पा मोरे सुरेश विटकर वुमन राइस चे अध्यक्ष सौ अनिता वर्मा जिल्हा समन्वयक सुशीलाताई पवार पिंपरी चिंचवड शहर संघटिका रूपालीताई आ उपजिल्हाप्रमुख वैभवीताई घोडके सौ पुष्पा सिंग यांच्या उपस्थिती सुरुवात झाली.

वरिष्ठ अधिकारी डॉ अलवी सय्यद डॉ पियुषा कडुस डॉ अभिजीत शेखर डॉ प्रकाश जाधव मुख्याध्यापिका सविता जाधव रितू पसरीचा मुख्याध्यापिका शोभा घावटे मुख्याध्यापिका विजयश्री काजळे सौ सुनीता कांबळे प्राचार्य गीता जोशी वैभवी खरात प्रकाश तंबोरे वैष्णव जाधव विजय पट्टर संजय गायके राज नखाते आशा सेविका जया चासकर व दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा तसेच क्रीडा खेळाडूं अनुष्का येळवे सृष्टी पवार श्रेया आलूर सार्थक आहेर या खेळाडूंना शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

त्यावेळेस माजी आमदार गौतम चाबुकस्वार हरिष आप्पा मोरे सुजाताताई नखाते प्राचार्य गीता जोशी वैभवी खरात यांनी आपले यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी तसेच या वेळेस जय हरी ग्रुप शिवसेना पक्षाचे महिला आघाडी युवा सेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक पालक विद्यार्थी खेळाडू उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख गोरख पाटील यांनी केले कार्यक्रमाचे आभार विधानसभा प्रमुख हरेश आबा नखाते यांनी केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️