Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • विधानसभा पावसाळी अधिवेशनात आमदार शंकर जगताप यांची दमदार कामगिरी
  • Daily Breaking News
  • Poilitical

विधानसभा पावसाळी अधिवेशनात आमदार शंकर जगताप यांची दमदार कामगिरी

suwarna gaware 21/07/2025
09f3310f-3b22-42bf-a594-7704ab2eaa5d
Spread the love

पिंपरी-चिंचवडच्या विविध प्रश्नांबरोबरच पत्रकार कल्याण महामंडळाची मागणी चर्चेत

पिंपरी, २१ जुलै – महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विविध लोकहिताचे विषय लावून धरत प्रभावी उपस्थिती नोंदवली. पंधरा बैठकींसाठी शंभर टक्के उपस्थित राहणाऱ्या मोजक्या आमदारांपैकी ते एक होते. प्रश्न विचारण्यापासून विधेयकांवरील चर्चेपर्यंत आणि ठोस सूचनांपासून औचित्याच्या मुद्द्यांपर्यंत त्यांनी दमदार कामगिरी बजावली.

पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची आग्रही मागणी

लक्षवेधी सूचना क्रमांक २४७३ अंतर्गत त्यांनी राज्यातील पत्रकारांच्या हितासाठी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कल्याण महामंडळ’ स्थापन करण्याची मागणी विधानसभेत स्पष्ट शब्दांत मांडली. या मागणीत आरोग्य विमा, अपघात विमा, शिष्यवृत्ती, किमान वेतन, निवृत्ती वेतन यासारख्या सुविधा सर्व पत्रकारांना मिळाव्यात यावर त्यांनी भर दिला.

मतदारसंघातील प्रश्नांवर विशेष लक्ष

जगताप यांनी विचारलेले ११ तारांकित प्रश्न आणि १० लक्षवेधी सूचना प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील गंभीर प्रश्नांशी निगडित होत्या. यातून स्थानिक प्रश्नांना विधानसभेत स्थान मिळाल्याचे उदाहरण दिसते.

प्रमुख लक्षवेधी सूचना:

  1. पिंपरी-चिंचवड डीपीतील बेकायदेशीर रस्त्यांची आरक्षणे रद्द करणे
  2. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक समस्या
  3. मालेगावमध्ये ५००च्या बनावट नोटांशी संबंधित गुन्हेगारी कारवाई
  4. पत्रकार कल्याण महामंडळाची गरज

उल्लेखनीय तारांकित प्रश्न:

  • मुळा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई
  • अन्नधान्य वितरण कार्यालयातील गैरकारभार
  • धर्मादाय रुग्णालयातील सवलतींच्या योजनेची ऑनलाईन अंमलबजावणी
  • अन्न व औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत
  • बनावट पॅथॉलॉजी लॅब्सवर कारवाई आणि दर नियंत्रण कायदा
  • शिक्षण विभागातील अपात्र शिक्षकांच्या वेतन घोटाळ्याची S.I.T. चौकशी
  • ओला-उबेरसारख्या सेवा कंपन्यांच्या नियंत्रणासाठी समिती नेमणूक
  • ST महामंडळातील जाहिरात परवान्यांमधील गैरव्यवहार

औचित्याचे मुद्दे: स्थानिक व राज्यस्तरीय प्रश्नांवर ठाम भूमिका

जगताप यांनी दोन महत्त्वाचे औचित्याचे मुद्दे विधानसभेत उपस्थित केले:

  1. पीसीएनटीडीएच्या आरक्षित जागांवरील ताबेदार नागरिकांना सातबारा व प्रॉपर्टी कार्ड देणे
  2. गोवंश हत्या व गोमांस वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी

जगताप यांनी पुढील पाच विषयांवर अर्धातास चर्चेसाठी मांडून सरकारचे लक्ष वेधले, मात्र बॅलेटमध्ये न आल्यामुळे चर्चा झाली नाही :

  • डीपी आराखड्यातील बेकायदेशीर आरक्षणे रद्द करणे
  • पवना, मुळा, इंद्रायणी नदी स्वच्छता व प्रदूषणमुक्ती
  • PMPMLच्या समस्यांचे निराकरण
  • मुंबई एक्सप्रेस हायवेवरील अपघात नियंत्रण
  • पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या नागरीकरणासाठी पायाभूत सुविधा विस्तार

विधेयकांवरील प्रभावी चर्चा

१. महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सुधारणा

जगताप यांनी कोयता गँग, वाहनांच्या काचा फोडणारी टोळकी, अमलीपदार्थ उत्पादक व विक्रेते, दूध व अन्न भेसळ करणारे माफिया यांना MCOCA अंतर्गत आणण्याची मागणी केली.

२.झोपडपट्टी पुनर्विकास विधेयक २०२५

झोपडपट्ट्यांमध्ये नियमबाह्य TDR ची काळी बाजारपेठ रोखण्यासाठी पारदर्शी आणि कठोर कायदा व्हावा, असे स्पष्ट मत मांडले.

मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा

हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश, वाहतूक कोंडी, अतिक्रमण, पूरस्थिती आदी विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेतली.

काळेवाडीतील बेकायदेशीर चर्चवर कारवाई व धर्मांतर विरोधी उपाययोजनांबाबतही मुद्दा मांडला.

विधान सभा समित्यांच्या कामकाजात सहभाग

जगताप यांनी अशासकीय विधेयक व ठरावांबाबतच्या समित्यांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. कामकाज क्रम ठरवण्याच्या बैठकीतही उपस्थित राहून कामगिरी बजावली.

राज्याच्या प्रगतीशी संबंधित मुद्द्यांवर स्पष्ट मत

  • शेतकऱ्यांसाठी हरित ऊर्जा पुरवठा योजना
  • गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर सुरक्षा आणि नार्कोटिक्स सेल स्थापन
  • डिजिटल भारताच्या दिशेने ५० सायबर लॅब्स आणि हेल्पलाइन क्रमांक सुरू
  • नव्या शिक्षण धोरणांतर्गत नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे प्रकल्प

लोकशाही मूल्यांचे जतन

जनसुरक्षा कायद्याबाबत बोलताना, त्यांनी व्यक्तीस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी कायद्याने पुराव्यांची अट ठेवली जाणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.

प्रभावी, अभ्यासू आणि परिणामकारक आमदार

आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केवळ प्रश्न विचारले नाहीत, तर ते स्थानीय आणि राज्यस्तरीय प्रश्नांवर सुसंगत, ठोस आणि व्यापक भूमिका घेऊन उभे राहिले. पत्रकार, कामगार, शिक्षक, रुग्ण, वाहतूकपीडित, झोपडीधारक, शेतकरी, महिला, विद्यार्थी अशा सर्व घटकांसाठी त्यांची लढाई दिसून आली. त्यांच्या या अभ्यासपूर्ण आणि जिव्हाळ्याच्या कामगिरीमुळे चिंचवडकरांचा आवाज विधानभवनात ठामपणे पोहचला.

खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ उपस्थित राहणारा नव्हे, तर लोकांचे प्रश्न धैर्याने मांडणारा असतो आणि आमदार शंकर जगताप यांनी याचे वस्तुपाठ दाखवले आहेत.

पत्रकार परिषदेस माजी महापौर उषा तथा माई ढोरे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, प्रदेश सदस्य संतोष कलाटे, माजी नगरसेविका उषा मुंडे, शारदा सोनवणे, अश्विनी चिंचवडे, संगीता भोंडवे, निर्मला कुटे, आरती चोंधे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, अभिषेक बारणे, सिद्धेश्वर बारणे, राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, संदीप कस्पटे, संतोष कांबळे, संदीप गाडे, विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी, महेश जगताप, काळूराम नढे, तानाजी बारणे, भाजप मंडलाध्यक्ष गणेश ढोरे, सनी बारणे, मोहन राऊत, हर्षल नढे, सोमनाथ तापकीर, मंडलाध्यक्षा पियुषा पाटील, रामदास कस्पटे, अतुल पाटील, नरेंद्र माने, दीपक भोंडवे, सोमनाथ भोंडवे, प्रसाद कस्पटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 49
Tags: #pavsali adhiveshan #shankar jagtap Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: तंत्रज्ञानाचा विवेकी आणि प्रभावी वापर सायबर पत्रकारितेत आवश्यक-ब्रह्माकुमारीज् आयोजित पुणे मीडिया संमेलनात माध्यम तज्ज्ञांचा आशावाद
Next: बांधकाम कामगारांचा राज्यव्यापी लढ्याचा निर्धार : काशिनाथ नखाते

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370
  • Daily Breaking News
  • Maharashtra

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

suwarna gaware 04/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.