


पिंपरी चिंचवड, ता. १९: शनिवार दिनांक 19 जुलै 2025 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सावित्रीबाई फुले कन्या शाळा मोशी क्रमांक 107 मध्ये डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे सॉफ्टवेअरचा वापर करून, शैक्षणिक वर्ष 2025 26 साठी शालेय मंत्रिमंडळ नेमण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली.

शालेय विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व समजावण्यासाठी व आपल्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया कशी पार पाडली जाते. याविषयी माहिती होण्यासाठी शाळेमध्ये उमेदवार निवडून, त्यांना निवडणूक चिन्ह देऊन, डिजिटल पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवली गेली. यामध्ये निवडणूक अर्ज भरण्यापासून, मतपत्रिका तयार करणे, विद्यार्थ्यांना विविध चिन्हांचे वाटप करणे, निवडणुकीचा प्रचार करणे, निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे.
यासारख्या अनेक बाबींचा समावेश केला गेला.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा अंबादास डांगे मॅडम यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. यामध्ये विद्यार्थ्यांमधून केंद्राध्यक्ष निवडणूक अधिकारी -१, निवडणूक अधिकारी -२, निवडणूक अधिकारी -३, निवडणूक अधिकारी -४,असे अधिकारी नेमले गेले.
सौ अश्विनी सावळकर (वाघमोरे) यांच्या प्रयत्नातून श्री. संदीप वाघमोरे सर यांनी निवडणुकीसाठी डिजिटल सॉफ्टवेअर तयार करून पर्यावरण पूरक पेपरलेस मतदान राबवले गेले. मतदानात पाचवी ते आठवीच्या 612 मतदारांपैकी 483 मतदार विद्यार्थिनींनी मतदान केले.
यामध्ये श्री.अमोल भालेकर सर, यांनी कम्प्युटर ऑपरेटर म्हणून महत्त्वाचे काम सांभाळले. श्री. मुक्तार शेख सर, श्री संतोष शितोळे सर व श्री सोमनाथ शिंदे सर यांनी या निवडणुकीचे कामकाज पाहिले. यामध्ये मतदान प्रक्रिया डिजिटल असल्याने निकाल ही लगेच लागला. यामध्ये स्वरा सचिन शिंदे मुख्यमंत्री, सायली सारूक, राधिका पवार यांच्यासह एकूण 12 उमेदवार निवडून आले.
याप्रसंगी पर्यवेक्षिका सुनीता गीते मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले माया लोखंडे मॅडम, पल्लवी सुरवसे मॅडम, संतोष पन्हाळे,संतोष गवारे, उमेश सूर्यवंशी, नितीन गोडे सर ,श्री.राजेद्र पानसरे यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया आनंददायी शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️