


पिंपरी चिंचवड, ता. १९: आदरणीय महाराज गुरुवर्य श्री. संदान सर यांच्या मधाळ, प्रेमळ ,सुस्पसष्ट मंत्रोच्चाराने श्री गणेश पूजन, अग्निदेवता पूजन, विष्णुदेवता पूजन आपल्या संत साई इंग्लिश स्कूल च्या प्रांगणात धार्मिक, पारंपरिक पद्धतीने चैतन्यमय वातावरणात मन:शक्तीच्या आधारे होमहवन उत्साहात संपन्न झाला. महाराजांनी आपल्या शाळेची जागा विविध मंत्रोच्चार, जप, सात्विक तथा भूमी शांती चा प्रयास केला.

तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या सुख, समृद्धी, शांततेसाठी अग्निदेवतेला स्मरून आवाहन केले. जो इतरांना समजून घेणारा आहे तो देव माणूस जाणावा, जो इतरांना समजून न घेता त्रास देणारा आहे तो’दानव’समजावा. असे परखड मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
गायत्री मंत्रोच्चाराने सर्व विद्यार्थ्यांना होमाचे दर्शन घेण्याचे भाग्य आज लाभले. आपल्या गुरुची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या समजावी, गुरू म्हणजे साक्षात परमात्मा असल्याचे त्यांनी नमूद केले.जीवनात ५0%आध्यात्मिक संस्कारांची शिदोरी आणि५०% परिश्रम असतील तर यश हे सुलभ होऊ शकते.
आपले माता, पिता, गुरू, यांच्या दर्शनाने रोज दिवसाची सुरुवात केली असता संस्कार क्षम जीवनचरित्र तयार होईल यावर त्यांनी विवेचनात्मक संबोधन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चयपाठ घेण्यात आला.
या यज्ञाचे आयोजन शाळेचे संस्थापक व मुख्याध्यापक श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर, मुख्यध्यापिका सौ. सुनिता ढवळेश्वर मॅडम, संचालिका पायल ढवळेश्वर मॅडम यांनी केले.
हा यज्ञ यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी शिक्षिका सौ. मालन लिगाडे, सौ. भारती ढवळेश्वर, सौ. आरती मुट्टगीशेत्तर, सौ. संगिता पाटील, श्री. अक्षय राणे सर तसेच शाळेतील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️