


पिंपरी दि.१५ – शेतकरी, कष्टकरी, वंचितांची लढाई यशस्वी लढणारे प्रा. एन.डी.पाटील तसेच कष्टकरी शोषितांचे राज्य यावे यासाठी लढणारे क्रांतिवीर स्वातंत्र्य सेनानी नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ,बांधकाम कामगार समन्वय समिती महाराष्ट्र, फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज चिंचवड येथे
पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, राजेश माने, सलीम डांगे भागवत नागपुरे, संदीप कांबळे, संदीप जाधव,अमृत पाटील,शीतल जाधव,रत्नाबाई पोळ,लंका सांगळे,पूजा कोळी,सविता खोकराळे,कविता वागीर,सचिन होमाडे,सुनील काटकर
राजू प्रजापती,कमल गायकवाड आदी
उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या लढाईनंतर कामगार,शोषित पीडित, अन्यायग्रस्त जनतेचे नागनाथ अण्णा आधारवड ठरले त्यांनी सहकार चळवळ वाढवली धरणग्रस्त व कोरडवाहू जमिनीच्या पाण्यासाठी संघर्ष केला. हुतात्मा सहकारी साखर कारखाना उभा केला. शिक्षण संस्था निर्माण केल्या.
प्रा एन डी पाटील सरांनी सामान्य, कामगार, शेतकरी यांचे मुले शिकावीत यासाठी प्रयत्न केले.
राजकीय पदे उपभोगून हि मोठेपणा न बाळगता सामन्यात मिसळून काम करत गेले. जनचळवळ फार मोठ्या प्रमाणात उभी करून वंचितांच्या मुलांसाठी शिक्षणाचे दारे उभी करून एक मोठा आदर्श निर्माण केला या दोन्ही महापुरुषाने समतेचा विचार जीवनभर अंगीकारला.
वंचितांच्या मुलांना शिक्षण दिले भागाच्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागाच्या लोकांसाठी उल्लेखनीय कार्य त्यांनी केले शेतकऱ्यांचे आंदोलन कोल्हापूर टोलनाक्याचा लढा इतर सामाजिक प्रश्नावर ती त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. कष्टकरी कामगार संघटना कडून त्यांना अभिवादन करण्यात आले .

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️