


पिंपरी, दि. १४ – युवती पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सौ. निलम संतोष म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त YCM रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले तसेच “मानवता कमाल हिताय संस्था” यांच्यावतीने गरजूंना अन्नदानाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाच्या वेळी डॉ. विनायक पाटील सर, जेष्ठ शिवसैनिक दीनानाथ जोशी, रामदास वानखेडे, सुनील दादा ढोकळे, संतोष जी भालेकर, युवराज भोसले सर, गौतम लहाने, राजू भाऊ आवळे, विक्रम ढोबळे, रमेश दादा मोरे, स्मिता ताई शिरवंदकर, पल्लवी ताई लहाने, नीता ताई गायकवाड, सुलभा ताई यादव, हसन मुलाणी आणि विष्णु मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमांमुळे सामाजिक जाणीवेतून जनसेवेचे उत्कृष्ट उदाहरण घालून देण्यात आले. सौ. निलम म्हात्रे यांच्या कार्याला उपस्थितांनी शुभेच्छा देत कौतुक केले.
संतोष म्हात्रे

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️