Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित राज्य परिषद सदस्यांचा सत्कार; शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटेंनी केले अभिनंदन
  • Poilitical
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित राज्य परिषद सदस्यांचा सत्कार; शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटेंनी केले अभिनंदन

suwarna gaware 12/07/2025
fa25ca67-3b0a-4f85-a3b6-b33d087aff9e
Spread the love

पिंपरी-चिंचवड, १२ जुलै २०२५: भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या राज्य परिषद सदस्यांच्या यादीत पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक अनुभवी नेत्यांचा समावेश झाल्याने शहरात उत्साहाचे वातावरण आहे. या नवनिर्वाचित सदस्यांचा पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राज्य परिषद सदस्यपदी निवड झालेल्यांमध्ये विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षाचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते पाटीलबुवा चिंचवडे, कामगार नेते हनुमंत लांडगे, आणि मातंग समाजातील युवा भाजप कार्यकर्ते धर्मेंद्र क्षीरसागर यांचा समावेश आहे. या निवडीमुळे समाजातील विविध घटकांना पक्षाशी जोडण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

या महत्त्वपूर्ण यादीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते, मंत्री, खासदार आणि आमदार यांचाही समावेश आहे. पक्षाची ध्येयधोरणे पुढे नेण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी या सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर भाजप कार्यालयात आयोजित या सत्कार सोहळ्यात शहराध्यक्ष बापू काटे यांनी या नवनिर्वाचित सदस्यांपैकी उपस्थित राज्य परिषद सदस्य उषा उर्फ माई ढोरे, अनुप मोरे, पाटीलबुवा चिंचवडे व हनुमंत लांडगे यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा सत्कार समारंभ पक्षासाठी केलेल्या योगदानाला आणि त्यांच्या भविष्यातील कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, शहर सरचिटणीस शैला मोळक, महिला मोर्चा शहराध्यक्ष सुजाता पालांडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अजित कुलथे, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप, कायदा आघाडीचे शहराध्यक्ष ऍड. गोरक्षनाथ झोळ यांच्यासह शिवराज लांडगे, राजाभाऊ मासुळकर, दिनेश यादव, हरिभाऊ चिंचवडे, प्रवीण कुंजीर, बाळासाहेब परघळे, दीपक गांगुर्डे, आदित्य काटे आदी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 55
Tags: #bjp #shatrugn kate Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: नदी सुधार प्रकल्प पिंपरी चिंचवड ची जैवविविधता नष्ट करणारी मशीन!
Next: ‘आई वडिलांमुळे मी घडलो!’ – अरुण बोऱ्हाडे

Related Stories

02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026
339d210a-b333-43c2-afcd-7ad3beb0934e
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

विधानसभेच्या अध्यक्षांनी माय मराठीची केलेली मोडतोड संतापजनक – काशिनाथ नखाते

suwarna gaware 24/06/2026
b75d053c-42ad-4520-a422-11db2ec46f42
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

सक्तीच्या टीओडी मीटर वरून महावितरणला कायदेशीर नोटीस

suwarna gaware 24/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.