


पिंपरी चिंचवड, ता. ११: निगडी प्राधिकरणा मधील ज्येष्ठ नागरिक संघातील 55 ज्येष्ठ नागरिकांनी १० जुलै रोजी मुंबई विधानसभा गृहाला भेट देऊन विधानसभेचे कामकाज कसे चालले याचा अनुभव घेतला.

मंत्री व आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडे श्री जयंत पाटील गिरीश महाजन कार्यसम्राट महेश दादा लांडगे यांच्याबरोबर संवाद साधला.ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे ज्वलंत प्रश्न आरोग्य वैद्यकीय सेवा घरांचे प्रश्न निर्भर पणे आमदारांपुढे मांडता आले.
श्री अण्णा बनसोडे यांनी जेष्ठ नागरिकांचे स्वागत केले हा कार्यक्रम मा राजीव मिसाळ माजी नगरसेवक व राष्ट्रवादीचे कार्यसम्राट यांनी आयोजित केला होता श्री दत्ता धामणस्कर सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्वांचे आभार मानले.
एक दिवसीय या सहलीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आपले हक्क व कर्तव्य याची जाणीव झाली असे कार्यक्रम जरूर प्रत्येक वॉर्ड मधील नागरिकांना ही संधी मिळावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️