


पिंपरी चिंचवड, ता. १०: निलम संतोष म्हात्रे – युवती पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा यांच्या वाढदिवसानिमित्त आज एक सामाजिक उपक्रम म्हणून मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले होते.

एकूण 142 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. वातावरण अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी होते. वाढदिवस साजरा करताना समाजासाठी काही करण्याचा संकल्प यानिमित्ताने पूर्णत्वास गेला.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️