


पिंपरी चिंचवड, ता. ७: हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्यानंतर शिवसेना-मनसे उद्धव साहेब ठाकरे आणि राज साहेब ठाकरे हे दोन तेजस्वी नेतृत्व एकत्र आल्याचा ऐतिहासिक क्षण आज संत तुकाराम नगर विभागाच्या वतीने जल्लोषात साजरा करण्यात आला!

दीनानाथ जोशी काका यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका सुलक्षणा ताई धर, युवती शहराध्यक्ष निलम संतोष म्हात्रे ज्येष्ठ शिवसैनिक वानखेडे बाबा, सुरेंद्र दादा पासलकर , विभागप्रमुख भोला राम पाटील, शाखा प्रमुख सुकवाणी कॅम्पस अमित फळके, शाखा प्रमुख रोहित लोणारे, शाखा प्रमुख साहिल शहा, भोसले सर, गिरी सर, दिलीप गावडे दादा, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कोळी काका, आल्हाट काका, बाळू मामा आदींच्या उपस्थितीत पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.
ही एकता म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना दिलेली खरी श्रद्धांजली आहे! ही मराठी अस्मितेच्या नवयुगाची सुरुवात आहे! ही सुरुवात आहे नवमहाराष्ट्राची! मराठी मन पुन्हा एकत्र येत आहे!
संतोष म्हात्रे, समन्वयक पुणे जिल्हा युवा सेना

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️