


पिंपरी, दि. ३ – संत तुकाराम नगर येथील रहिवाशांसाठी धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान व मांगल्य सेवा विकास संस्था यांच्या वतीने रेशनिंग कार्ड मार्गदर्शन व दस्तऐवज शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात बंद झालेली रेशनिंग कार्डे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. तसेच नवीन अर्ज प्रक्रियेबाबत नागरिकांना सविस्तर माहिती व मार्गदर्शन देण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
संतोष म्हात्रे व निलम म्हात्रे यांच्या विशेष पुढाकाराने व नियोजनातून हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.
या उपक्रमात राजू आवले लाला गिरी सर यांची मोलाची साथ व मदत लाभली. त्यांच्या सहकार्यामुळे हा सामाजिक उपक्रम अधिक प्रभावी ठरला.
शिबिरात संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरणे, कागदपत्रे तपासणी आणि मार्गदर्शन अशा सुविधा पुरवल्या. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले.
सामाजिक बांधिलकीतून अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
