


पिंपरी, दि. ३० जून २०२५ — युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हा स्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा आज संत तुकाराम नगर येथील विरंगुळा केंद्रात मोठ्या उत्साहात पार पडली.

या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार तथा शिवसेना पुणे जिल्हाध्यक्ष मा. गौतमजी चाबुकस्वार यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला अध्यक्ष रुपाली ताई आल्हाट, युवा सेना पुणे जिल्हा प्रमुख अनिकेत भाऊ घुले,उपजिल्हाध्यक्ष हाजी दस्तगीर मणियार, ज्येष्ठ शिवसैनिक दीनानाथ जोशी, वाहतूक विभाग अध्यक्ष संजय दादा यादव, युवा सेना पदाधिकारी गौतम लहाने, उपविभाग प्रमुख सागर शिंदे, उपविभाग संगीटिका श्रद्धा शिंदे, उपविभाग प्रमुख भोला राम पाटील, शाखा प्रमुख अमित फळके, उद्योजक सुनील दादा गवांदे, डॉ. यासीन तांबोळी, हासन मुलाणी, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा देशमुख, लहुजी सेनेचे राजू भाऊ आवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीनानाथ जोशी यांच्या हस्ते श्रीफळ वाहून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्लब्समधून एकूण २३० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. यामध्ये आर्यन्स मार्शल आर्ट्स, संत तुकाराम नगर यांनी विजेतेपद पटकावले वारियर्स टायक्वांडो अकॅडमी, नवी सांगवी यांनी उपविजेतेपद, तर युनायटेड मार्शल आर्ट्स, काळेवाडी यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अभिषेक शॉ सर यांनी केले. पंच मंडळात परवेज शेख, जुई देशमुख, ऑस्ट्रिन रॉड्रिग्ज, तरुण पाटील, कार्तिक वाघ, आदित्य शिरसाठ, आदित्य अडागळे, अजिंक्य आडसूळ, ओम देशमुख, युवराज यांनी संयोजनात मोलाची भूमिका बजावली.
या स्पर्धेचे आयोजन युवासेना पुणे जिल्हा समन्वयक संतोष म्हात्रे व युवती अध्यक्ष पिंपरी-चिंचवड शहर नीलम म्हात्रे यांनी केले होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️