


पिंपरी चिंचवड, ता. १५: दिनांक १४ सप्टेंबर रोजी झालेल्या पुणे डिस्ट्रिक्ट कराटे डेव्हलपमेंट असोसिएशन सलग्न महाराष्ट्र कराटे असोसिएशन (मुंबई),सलग्न महाराष्ट्र ओलम्पिक असोसिएशन जिल्हास्तरीय अजिंक्यपद कराटे स्पर्धा २०२५ चे आयोजन संत गोरोबाकाका हॉल,काळेपडळ,हडपसर या ठिकाणी झाले.


यात पुणे जिल्ह्यातून विविध सस्था,अकॅडमी,असोसिएशन च्या विद्यार्थ्यानी ऊसपूर्त असा सहभाग नोंदवला.
स्पर्धेमध्ये पिंपळे गुरव मधील जे के एन एस के आय संस्थेच्या पिंपळे गुरव शाखा मधील मुलांनी सुवर्ण पदक प्राप्त केले. त्याची निवड छत्रपती संभाजी नगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र कराटे असोसिएशन,सलग्न महाराष्ट्र ओलम्पिक असोसिएशन राज्य स्तरीय स्पर्धे साठी झाली.
खेळाडूंची नावे खालील प्रमाणे
१)स्वराली तेलसे
काता- सुवर्ण पदक
कुमिते-सुवर्ण पदक
२)सक्षम शिंदे
कुमिते- सुवर्ण पदक
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक रोहित जाधव अध्यक्ष:आर जे स्पोर्ट्स अकॅडमी हे प्रशिक्षण देत आहेत.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
