Skip to content
28/06/2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

cropped-images.jpeg

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2024
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • महापालिका हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे: आमदार लांडगे
  • Daily Breaking News
  • Poilitical

महापालिका हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे: आमदार लांडगे

suwarna gaware 26/06/2025
114af1a4-8b3b-4d8c-8be7-fbb58f80a7af
Spread the love

UNCLOGHinjawadiITPark

  • भाजपा आमदार महेश लांडगे यांची मागणी
  • स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींची बैठक घ्या

पिंपरी-चिंचवड, ता.२६: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दवाढ, तसेच चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर या नगरपरिषदांचा समावेश करून स्वतंत्र महापालिका स्थापनेबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि शहर विकास क्षेत्रातील तज्ञांसोबत बैठक घ्यावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

यासंदर्भातील अधिकृत पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले असून, संबंधित भागातील स्वयंसेवी संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ अधिकारी आणि नागरी संघटनांसोबत सविस्तर सल्लामसलत होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

आमदार लांडगे यांनी पत्रात नमूद केले आहे की, हिंजवडी, माण, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे व गहुंजे या सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्यास राज्य सरकारने अनुकूलता दर्शविल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून समोर आली आहे. आयटी कंपन्यांचा मोठा जमाव, वाढती लोकसंख्या, आणि मुलभूत सुविधांचा अभाव ही स्थिती लक्षात घेता या भागाचा पालिकेत समावेश अत्यावश्यक आहे. तसेच, आयटी कर्मचाऱ्यांच्या वतीने #UnclogHinjawadiITPark ही स्वाक्षरी मोहीम देखील सुरू करण्यात आली असून, हिंजवडी व परिसराच्या समावेशाची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, सध्या क्षेत्रफळ वाढल्यामुळे महापालिकेवर सेवा पुरवठ्याचा ताण वाढला आहे. त्यामुळे चाकण, आळंदी व राजगुरुनगर या नगरपरिषदांचा स्वतंत्र महापालिका म्हणून विकास करण्यास हरकत नाही, असे मत महापालिकेने शासनास कळवले आहे.

“हा संपूर्ण परिसर PMRDA च्या हद्दीत असून, त्याचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसर शाश्वत विकासाचे रोल मॉडेल बनू शकतो,” असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका हद्दवाढ आणि नवीन महापालिकेच्या स्थापनेबाबत सविस्तर बैठक लवकरच आयोजित व्हावी, अशी नम्र विनंती आमदार लांडगे यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.


प्रतिक्रिया :
“पिंपरी-चिंचवड परिसराचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या, आयटी कंपन्यांची वाढती संख्या, आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांची वाढती मागणी पाहता, नियोजनबद्ध विकासासाठी महापालिका हद्दवाढीचा निर्णय अत्यावश्यक आहे. हिंजवडी आणि आजूबाजूच्या गावांचा महापालिकेत समावेश झाल्यास विकासाला गती मिळेल आणि नागरिकांना शासकीय सुविधा अधिक सुलभपणे मिळतील.

तसेच, चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर या नगरपरिषदांचा स्वतंत्र महापालिकेत समावेश झाल्यास, त्या परिसराचाही सर्वांगीण विकास शक्य होईल. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विषयावर स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञांबरोबर सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची विनंती केली आहे. या बैठकीत सर्व संबंधितांचे मत जाणून घेऊन योग्य दिशा आणि निर्णय होईल, असा विश्वास आहे.

  • महेश लांडगे,आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 5
Tags: #Hinjwadiitpark #आमदार महेश लांडगे Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन
Next: महापुरुषांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज : पो. विठ्ठल साळुंखे

Related Stories

b3ce8fd8-df48-4f6a-a663-31e12a42b6df
  • Education
  • Daily Breaking News

डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ

suwarna gaware 28/06/2025
ffe8731f-cc46-4ee7-9e17-1106afc751de
  • Daily Breaking News
  • Poilitical

UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!

suwarna gaware 28/06/2025
Official_Logo_of_PCMC
  • Daily Breaking News

‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

suwarna gaware 28/06/2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ b3ce8fd8-df48-4f6a-a663-31e12a42b6df 1

डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ

28/06/2025
UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार! ffe8731f-cc46-4ee7-9e17-1106afc751de 2

UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!

28/06/2025
‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद Official_Logo_of_PCMC 3

‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

28/06/2025
‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित 061f5c6d-623c-49d0-b6a8-f4d09d8df1a5 4

‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित

28/06/2025
पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप 1c0bdf40-bdb1-40e4-b076-32fe2fe18c3b 5

पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप

27/06/2025

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

b3ce8fd8-df48-4f6a-a663-31e12a42b6df
  • Education
  • Daily Breaking News

डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ

suwarna gaware 28/06/2025
ffe8731f-cc46-4ee7-9e17-1106afc751de
  • Daily Breaking News
  • Poilitical

UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!

suwarna gaware 28/06/2025
Official_Logo_of_PCMC
  • Daily Breaking News

‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

suwarna gaware 28/06/2025
061f5c6d-623c-49d0-b6a8-f4d09d8df1a5
  • Cultural

‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित

suwarna gaware 28/06/2025

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ
  • UNCLOGHinjawadiITPark : ‘‘अनलॉग हिंजवडी’’ साठी विधानसभेत आवाज उठवणार!
  • ‘हरित सेतू’ ब्रँड डिझाइन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
  • ‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित
  • पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनी महोत्सवाचा समारोप

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.