


पुणे, दि. २२: हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेड (एच.ए.एल) कंपनीमध्ये २१.०६.२०२५ रोजी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय) २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘ एक पृथ्वी एक स्वास्थ्य’ ही योग दिनाची थीम कंपनीमध्ये राबविण्यात आली.


प्राणायाम आणि ध्यान धारणा कार्यक्रम तसेच विविध योग व्यायामाचे म्हत्व यावेळी कर्मचारी व विद्यार्थ्याना सांगण्यात आले. एचएएलचे सर्व कर्मचारी, एच.ए. महिला क्लबच्या सदस्या आणि एच.ए. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने योग दिनामध्ये सहभाग घेतला. योग दिन कार्यक्रमात सुमारे ५०० जण उत्स्फूर्त पणे सहभागी झाले होते.

हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती नीरजा सराफ यांनी योगा दिनानिमित्त सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे दररोज योगा करण्याचे आवाहन केले. तसेच, आरोग्यवर्धक आयुष्य जगण्यासाठी योगाचे जीवनात अविभाज्य महत्त्व सर्वांना पटवून दिले.



🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️