Skip to content
01/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोषात स्वागत!
  • Cultural
  • Maharashtra

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोषात स्वागत!

suwarna gaware 19/06/2025
329a7ed2-93ab-47e1-b643-fba8babb7409
Spread the love
  • भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले सारथ्य
  • आयुक्त शेखर सिंह यांच्यासाथीने पालखी रथाला साथ

पिंपरी-चिंचवड, ता.१९: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन झाले. भाजपा आमदार महेश लांडगे आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सोबतीने पालखी रथाचे सारथ्य केले. राजकीय लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रमुख यांनी वारकरी सांप्रदायाची पताका अभिमानाने खांद्यावर घ्यावी, असा सुरेख संगम यानिमित्ताने पहायला मिळाला.

भारतीय जनता पार्टी आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने संत तुकोबांच्या पालखीचे भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे दिमाखात स्वागत करण्यात आले. अवघी उद्योगनगरी तुकोबांच्या नाम गजराने दुमदुमून गेली असून, टाळ -मृदुंगाच्या तालावर वारकरी ठेका धरत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याच्या स्वागताची सर्व तयारी केली होती.

आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरात भक्तिभावाने आणि जल्लोषात दाखल झाला. शहराच्या भक्ती-शक्ती चौकात वारीचे भव्य स्वागत करण्यात आले. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पालखी सोहळ्याचे सारथ्य करत श्रद्धेचा अनोखा संदेश दिला. शहरात पालखीचे आगमन होताच, टाळ-मृदुंगांच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात वारीच्या आगमनाने वातावरण भारावून गेले. वरुणराजानेही वारीच्या स्वागतासाठी हजेरी लावली, आणि त्या सरींमध्ये हजारो वारकऱ्यांचा मेळा एकत्रितपणे आकुर्डीतील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाला.

दरम्यान, भक्ती-शक्ती चौकात वारकऱ्यांसाठी विविध सेवा उपक्रम राबवले गेले. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, आरोग्य तपासणी शिबिरे, पाणी आणि फराळ व्यवस्था आणि स्वच्छतागृह व निवाऱ्याची सोय यामुळे वारकऱ्यांना अत्यंत सुलभ व सुरक्षित वातावरण मिळाले. लाडू, वॉटर बॉटल, रेनकोट, छत्री वाटप करण्यात आले. शहरातून पालखी सोहळा आकुर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाला असून, हजारो भाविक, महिला, युवक आणि लहानग्यांनीही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने सोहळ्याला दिलेल्या शिस्तबद्ध आणि आदर्श सहकार्याचे वारकऱ्यांनी मनापासून कौतुक केले.


प्रतिक्रिया :
“वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. वारकऱ्यांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आणि भाग्य आहे. “आषाढी वारी” ही महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक विलक्षण आणि जगात कुठेही न सापडणारी परंपरा आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या – त्या फक्त पालख्या नाहीत, त्या श्रद्धेच्या गंगा आहेत ज्या लाखो वारकऱ्यांच्या पावलांमधून पंढरीच्या दिशेने वाहत असतात. वारी म्हणजे नुसती भक्ती नव्हे, ती शिस्त, सेवा, साधना आणि समर्पण यांचा संगम आहे.

  • महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 57
Tags: #Palkhi २०२५ #shekhar singh #आमदार महेश लांडगे #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics भोसरी

Continue Reading

Previous: जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वागत…
Next: पुणे मेट्रोचे खडकी मेट्रो स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत दाखल

Related Stories

ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026
2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba
  • Daily Breaking News
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

suwarna gaware 19/05/2026
bb6b2fde-1247-45cc-b504-4af03fbdcd44
  • Daily Breaking News
  • Cultural

दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली

suwarna gaware 03/04/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 1

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026
एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार 88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5 2

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

01/06/2026
बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f 3

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

23/05/2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न 2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba 4

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

19/05/2026
असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे 74db5dbb-9370-4788-826a-c0a38da06088 5

असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

17/05/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026
2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba
  • Daily Breaking News
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

suwarna gaware 19/05/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे
  • एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार
  • बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
  • असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.