


पिंपरी चिंचवड, ता. १७( टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड): सध्या महावितरण कंपनीकडून प्रत्येक सहकारी गृह रचना संस्थेमध्ये असणाऱ्या सदनिकाधारकांचे जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम चालू आहे. परंतु नवीन बसवलेल्या स्मार्ट मीटरने विजेचे बिल आवाच्या सव्वा येत आहे. ते खूप मोठ्या प्रमाणात येत आहे.

त्यामुळे या नवीन स्मार्ट मीटरच्या विश्वसार्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. तरी कृपया आपल्या महावितरण कंपनीकडून जबरदस्तीने, बळजबरीने जी ही मीटर बदलून घेण्याची मोहीम चालू आहे ती कृपया थांबवाववी. याबाबत आमच्या सोसायटीधारकांच्या असणाऱ्या शंका, कुशंका यावर चर्चा करून मगच यावर निर्णय घ्यावा ही विनंती.माननीय कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, भोसरी डिव्हिजन यांना केली आहे.
आपल्या स्तरावरून बळजबरीने ही मोहीम रेटून नेण्याचे काम चालू केल्यास त्याला आमच्या फेडरेशनचा तीव्र विरोध असेल. तरी कृपया आपल्या स्तरावरून बळजबरीने ग्राहकांना विश्वासात न घेता नवीन स्मार्ट मीटर बसवू नयेत ही विनंती मुख्यमंत्री, तथा ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय, आमदार पै. श्री. महेशदादा लांडगे , भोसरी विधानसभा मतदारसंघ यांना देखील केली आहे.
स्मार्ट मीटर च्या नावाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने जी एका खाजगी कंपनीचे मीटर घेऊन मीटर बदलून घेण्याची मोहीम चालवली आहे त्याला आमच्या फेडरेशनचा पूर्णपणे विरोध आहे. सदर स्मार्ट मीटर बदलल्यानंतर ग्राहकांना दुप्पट तिप्पट लाईट बिल येत आहे. ही महावितरण कडून ग्राहकांची एक प्रकारे लूट चालू आहे. हे सर्व मीटर फॉल्टी आहेत. त्यामुळे महावितरणच्या या जबरदस्तीला आमचा पूर्णपणे विरोध आहे.
संजीवन सांगळे, अध्यक्ष ,चिखली- मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
