


राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्षा तथा बचत गट महासंघ सेलच्या शहराध्यक्षा सौं ज्योती गोफणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे खाऊने स्वागत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
पिंपरी चिंचवड, ता. १६ जून २०२५ (टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड) – शाळेच्या प्रवेशद्वारावर बांधलेले तोरण, फुलांनी सजवलेले शाळांचे वर्ग. रांगोळ्यांची आरास.. औक्षण करणारे शिक्षकवृंद, गुलाबपुष्प आणि खाऊचे वाटप.. नवीन गणवेश.. बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचलित राजर्षी शाहू महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या दिवशी आनंद, उत्साह, कुतूहलाने भारलेले वातावरण होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्याध्यक्षा तथा बचतगट महासंघ सेलच्या शहराध्यक्षा सौं ज्योती गोफणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव एल. एस. कांबळे शाळेचे मुख्याध्यापक श्री बाबाजी शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, स्वच्छ भारत अभियानाचे शहराचे ब्रँड अँबेसिडर यशवंत कन्हेरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा कविता खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये स्वच्छता अभियानाची परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल कार्यक्रमाच्या आयोजिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्षा बचत गट महासंघ सेल सौं ज्योती गोफणे यांच्या हस्ते यशवंत कन्हेरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष घरडे, सुजाता जोगदंड, पूनम तारख, कोमल गायकवाड, जितेंद्र सूर्यवंशी, किशोर बडे, सौ. व्होनमाने, जयश्री महानवर, अमोल सूर्यवंशी, प्रमोद रायकर, धुडकू कुवर, स्वप्नील पठारे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद डोंगरदिवे तर आभारप्रदर्शन संदीप बोर्गे यांनी केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️