


पिंपरी चिंचवड, ता. १७(टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड): मोरे वस्ती, चिखली येथील महादेव मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांच्या सह श्री लक्ष्मण गोफणे सर, अजय दूधभाते, महावीर काळे सर, संजय नायकवडी, विठ्ठल देवकते, नामदेव मासाळ, हिराकांत गाडेकर, प्रदीप लोखंडे, सचिन शिंदे, अजित चौगुले, किरण सूर्यवंशी, विलास महानवर, आदी सर्वजण उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन अशोक ठोंबरे, बिरुदेव मोटे, सुनील शिंदे, आप्पा देवकते, मनोज मिसाळ, रोहन कांबळे, सुरज धायगुडे आदी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी केले होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️