


पिंपरी चिंचवड, ता. १७ (टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड): वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक आणि संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड यांच्या मार्गर्शनाखाली संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि वनविभाग चाकण व कोयाळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने ४०० पिंपळ, लिंब, वावळा, कांचन, गुलभेंडी, शमी, शिरस इत्यादी वृक्षाची लागवड करण्यात आली.

सदर कार्यक्रमासाठी कोयाळी गावचे आदर्श सरपंच विकास सेठ भिवरे व डॉ. मोहन गायकवाड यांनी वृक्ष पूजा करून झाडे लावण्यात सुरुवात केली. वनपरिंडळ अधिकारी आळंदी आनंदकुमार इंदलकर व वनरक्षक कोयाळी नवनाथ पगडे यांनी झाडे लावण्या संदर्भात मार्गदर्शन केले .
वनसेवक दौलत वाडेकर ग्रामस्थ धनराज तोंडे, अजय कोळेकर सुरेश खंडवे तसेच संस्कार प्रतिष्ठानचे सभासद सुनिता गायकवाड रोहित मोरे श्वेता मोरे संध्या स्वामी सायली सुर्वे राजेंद्र फडतरे प्रभाकर मेरूकर शिवानी जगदाळे प्रिया पुजारी पांडुरंग सुतार अनिल जगदाळे दिपाली मोरे खुशी ओवाळ रंजना जोशी विकास पाटील आनंद पाथरे मोहिनी सूर्यवंशी अरुण कळंबे वैशाली खुडे सुधाकर खुडे यांनी सहभाग घेतला.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️