


पिंपरी-चिंचवड, ता. १०: कासारवाडी मधील अभिनव गगन स्पोर्ट्स क्लब व हिंदवी मित्र मंडळ यांच्या वतीने इ.10 व इ.12 वी मध्ये वार्षिक परिक्षेत 80 % पेक्षा अधिक गुण प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे व प्रवचनकार ह.भ.प.किसन महाराज चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

आजच्या विद्यार्थ्यांकडे आपले कौशल्य सिद्ध करण्यास अनेक शाखा उपलब्ध आहेत असे सांगतानाच विद्यार्थ्यांनी गुणांपेक्षा , गुणात्मक वाढी कडे अधिक लक्ष द्यावे त्याच बरोबर नौकरी मागणारे न बनता नौकरी देणारे बना असे आवाहन किसन महाराजांनी विद्यार्थ्यांना केले.
या समयी 70 पेक्षा अधिक विद्यार्थी व पालकांना गौरव पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.कार्यक्रमास नगरसेविका आशा धायगुडे – शेंडगे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विशाल ओव्हाळ, कृष्णा नलावडे, अभिजीत कट्टे, अमित चौकडे,संभाजी शेंडगे,आदित्य औटे, दुर्वांक पड्याळ, इशांत घरटे, अर्जुन बजबळकर,शौर्य गव्हाणे, रवी वाढवणे,स्वरूप बनसोडे,अशिष जाधव,सुवर्णा निकम,स्नेहा काणेकर,निता शेंडगे यांनी सहकार्य केले.निवेदन निशा निकम यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन संजय शेंडगे यांनी केले .

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️