Skip to content
12/06/2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

cropped-images.jpeg

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2024
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • वडाच्या झाडाचे रोपे देऊन महात्मा फुले नगर मध्ये वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Cultural

वडाच्या झाडाचे रोपे देऊन महात्मा फुले नगर मध्ये वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा

suwarna gaware 10/06/2025
3a6d56bb-1c57-4471-b407-527ff51dd4a0
Spread the love

चिखली, दि. ३ (वार्ताहर) पती- पत्नीचे नाते सात जन्म टिकावे यासाठी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला सुवासिनींनी वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले. यानिमित्त चिखली येथील महात्मा फुलेनगरमधील श्री गणेश मंदिराच्या प्रांगणात मोठ्या वटवृक्षाखाली सुवासिनींची गर्दी झाली होती.

आख्यायिकेनुसार सत्यवान आणि सावित्री या दाम्पत्याच्या आयुष्यात आलेला एक दिवस म्हणून वटपौर्णिमा आधुनिक युगातही तितक्याच पारंपरिक पद्धतीने साजरा केली जात आहे. हिंदू धर्मातील सण, प्रथा, परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडल्या गेल्या आहेत. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी मनोभावे सौभाग्यवतींनी पूजा केली.

सौभाग्याचे लेणं लेवून मिळेल तिथे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी पोहोचल्या.
सुवासिनींनी बाजारातून वडाची फांदी आणून घरीच किंवा अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये, मोकळ्या पटांगणात पूजा न करता परंपरेनुसार वडाच्या झाडाला सुवासिनींनी सात फेरे मारीत धागा बांधावा व आपण दरवर्षी एक वडाचे झाड लावून त्याचे संवर्धन करावे असे सामाजिक कार्यकर्ते यशवंत कन्हेरे यांनी सांगितले.

त्यानंतर तिथे उपस्थित ब्राह्मणांना दान-दक्षिणा देत इतर सुवासिनींनी सौभाग्याचे लेणे हळद-कुंकू लावून, आंब्यांचे वाण देऊन ओट्या भरल्या.

वटपौर्णिमेनिमित्त महिलांकडून एकमेकींना शुभेच्छाही दिल्या जात होत्या. सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यानातील भल्यामोठ्या डेरेदार वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिला वर्गाची झुंबड उडाली होती. त्या ठिकाणी उत्सवाचे रूप आले होते. मंदिराच्या ठिकाणी केळी, सफरचंद, आंबा, जांभूळ आदी वटपौर्णिमेच्या पूजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत पतीसह महिलांची गर्दी होती. परिसरात दुपारपर्यंत वडाची पूजा आटोपल्यानंतर घराघरात जाऊन वाण देण्यासाठी महिलांची धावपळ सुरू होती.

वटपौर्णिमेच्या दिवशी चोरीचे प्रमाण अधिक असते त्यामुळे चिखली पोलीस स्टेशनचे निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी उपस्थित महिला भगिनींना दागिन्याचे संरक्षण करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रसंगी
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शिवानंद चौगुले, मारुती जाधव, पांडुरंग पिंगळे कीर्तीताई जाधव आदी महिला भगिनींच्या सुरक्षेसाठी तैनात होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 11
Tags: #vatpournima #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad भोसरी

Continue Reading

Previous: राजेश आगळे यांची महापालिका कायदा सल्लागार पदी नियुक्ती
Next: Green Municipal Bonds : पिंपरी-चिंचवड महापालिका ठरली देशात पहिली!

Related Stories

57fefe74-084d-4b5f-8511-41b263d00602
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

परिस्थिती बेताची, नाजुक असली तरीही मुलांना शिकवणार

suwarna gaware 12/06/2025
b0186eed-87b1-4a50-8667-4b580971bcb7
  • Cultural

वटपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे वटवृक्षाचे रोपण

suwarna gaware 12/06/2025
a277baea-4e68-42d3-887b-059551040c3e
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे

suwarna gaware 11/06/2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

परिस्थिती बेताची, नाजुक असली तरीही मुलांना शिकवणार 57fefe74-084d-4b5f-8511-41b263d00602 1

परिस्थिती बेताची, नाजुक असली तरीही मुलांना शिकवणार

12/06/2025
महाराष्ट्र कुष्ठपिढीत संघटना, एप्पल संस्थेकडून अनोश कांबळेचा सत्कार ced8f4a9-b331-494f-ba9f-58147cefcee6 2

महाराष्ट्र कुष्ठपिढीत संघटना, एप्पल संस्थेकडून अनोश कांबळेचा सत्कार

12/06/2025
वटपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे वटवृक्षाचे रोपण b0186eed-87b1-4a50-8667-4b580971bcb7 3

वटपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे वटवृक्षाचे रोपण

12/06/2025
मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे a277baea-4e68-42d3-887b-059551040c3e 4

मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे

11/06/2025
इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न 0174ce86-6568-449b-9119-3e944503b282 5

इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न

10/06/2025

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

57fefe74-084d-4b5f-8511-41b263d00602
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

परिस्थिती बेताची, नाजुक असली तरीही मुलांना शिकवणार

suwarna gaware 12/06/2025
ced8f4a9-b331-494f-ba9f-58147cefcee6
  • Daily Breaking News
  • Sports

महाराष्ट्र कुष्ठपिढीत संघटना, एप्पल संस्थेकडून अनोश कांबळेचा सत्कार

suwarna gaware 12/06/2025
b0186eed-87b1-4a50-8667-4b580971bcb7
  • Cultural

वटपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे वटवृक्षाचे रोपण

suwarna gaware 12/06/2025
a277baea-4e68-42d3-887b-059551040c3e
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे

suwarna gaware 11/06/2025

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • परिस्थिती बेताची, नाजुक असली तरीही मुलांना शिकवणार
  • महाराष्ट्र कुष्ठपिढीत संघटना, एप्पल संस्थेकडून अनोश कांबळेचा सत्कार
  • वटपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे वटवृक्षाचे रोपण
  • मित्रत्व हे ‘माझी जीवनगंगा’चे बलस्थान! – राजन लाखे
  • इंद्रायणीच्या साक्षीने ‘कृष्णार्पण’चे प्रकाशन संपन्न

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.