


पिंपरी, दि. १०: राजेश लक्ष्मी अंकुश आगळे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कायदा सल्लागार पदी नियुक्ती झाली आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे.

आगळे यांनी उपायुक्त म्हणून २ वर्षे, सहाय्यक आयुक पदी ३ वर्ष, प्रशासन अधिकारी- ०५ वर्ष अशी मनपामध्ये एकूण सेवा त्यांची २५ वर्ष झाली आहे.
म.न.पा मध्ये प्रशासन, वैद्यकीय , करसंकलन , ई. क्षेत्रीय कार्यालय, झो.नि.पू, नागरी सुविधा केंद्र तसेच आकाशचिन्ह परवाना विभागातील कामकाजाचा त्याना अनुभव आहे.
एम कॉम, बी एम सी सी कॉलेज , पुणे , डीएलएलअँडएल डब्ल्यू , एलएलबी एसएनबीपी कॉलेज असा त्यांचा शैक्षणिक प्रवास आहे. त्यामुळे नक्कीच कायदा सल्लागार म्हणून त्यांची निवड योग्य ठरली असून त्यांचे योगदान महापालिकेसाठी मोलाचे ठरत आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
