Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार!
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार!

suwarna gaware 07/06/2025
8bfbf703-caef-47d4-8f2e-ec12520278cc
Spread the love
  • महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे आश्वासन
  • भाजपा आमदार महेश लांडगे यांची प्रशासनाला सूचना

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी,दि.७: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्यामध्ये मोशी येथे कत्तलखाना प्रस्तावित केला होता. या आरक्षणास स्थानिक नागरिक, भूमिपुत्र आणि सकल हिंदू समाजाचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे सदर आरक्षण बदल करुन, त्याच ठिकाणी गोशाळा उभारण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आग्रही भूमिका घेतली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने नवीन प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यावर सर्वसामान्य नागरिक, भूमिपुत्र, लोकप्रतिनिधी यांच्या हरकती-सूचना मागवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने मौजे मोशी येथील नवीन गट नं. 325 (जुना गट नं. 323) या गावच्या हद्दीत कत्तलखान्यासाठी जागा आरक्षीत केली आहे. याला स्थानिक नागरिक, हिंदूत्ववादी संघटना आणि भाजपा आमदार महेश लांडगे यांनी विरोध केला.

दरम्यान, मोशी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेतली. मोशी हे ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीकोनातून महत्त्वाचे गाव असून, येथै अनेक धर्म, जाती आणि पंथाचे लोक शांततेने वास्तव्य करतात. अशा गावात कत्तलखाना सुरू केल्यास सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. हा हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारा निर्णय आहे.

तसेच, सार्वजनिक पर्यावरण, नागरी आरोग्य आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रशासनाने सदर कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करावे आणि त्या ठिकाणी गोशाळा सुरू करावी. कारण, याच परिसरात मोशीचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री. नागेश्वर महाराज यांचे समाधीस्थळ आहे. या ठिकाणी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये भंडारा उत्सव साजरा केला जातो. तसेच, श्रीक्षेत्र आळंदी आणि श्रीक्षेत्र देहू यांच्यामध्ये मोशी गाव असून, वारकरी सांप्रदाय या भागात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सदर आरक्षण रद्द करावे, अन्यथा मोशी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.

यावर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ग्रामस्थांची भूमिका समजून घेतली. आमदार महेश लांडगे यांनी याबाबत मागणी केली आहे. त्यानुसार, सदर कत्तलखाना आरक्षण रद्द करण्यात येईल आणि त्या ठिकाणी गोशाळा आरक्षण निश्चित करण्याबाबत संबंधित कमिटीसमोर प्रस्ताव ठेवण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रारुप विकास आराखड्यामध्ये (डीपी) दर्शविलेल्या मोशी-डुडुळगाव दरम्यानच्या कत्तलखान्यासंदर्भात मोशी येथील ग्रामस्थांनी आज आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. आळंदी देवस्थान पदाधिकाऱ्यांसह मोशी ग्रामस्थांचाही कत्तलखान्याला विरोध केला आहे. डीपीची आखणी करणाऱ्या समितीने कत्तलखान्यासाठी वेगळी जागा निश्चित करायला हवी होती. डीपी नियोजन समितीसमोर तसा प्रस्ताव ठेवणार आहे. कत्तलखान्याची जागा बदलण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहे.


प्रतिक्रिया :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. ग्रामस्थ, स्थानिक नागरिक, भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या हरकती-सूचना घेतल्या जात आहेत. त्यावर सुनावणीही होणार आहे. सदर डीपी प्लॅन हा अद्याप अंतिम झालेला नाही. मोशी येथे कत्तलखाना कदापि होवू देणार नाही. त्याच ठिकाणी गोशाळा सुरू केली जाईल. याबाबत प्रशासनाकडे भूमिका मांडली आहे. भूमिपुत्र, शेतकरी, वारकरी सांप्रदाय आणि तमाम हिंदू बांधवांच्या मागणीप्रमाणे गोशाळा करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत.

  • महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 52
Tags: #bjp #shekhar singh Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पर्यावरण दिनी ‘एक झाड  एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प”
Next: आयुक्त साहेब , रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा..

Related Stories

02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026
339d210a-b333-43c2-afcd-7ad3beb0934e
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

विधानसभेच्या अध्यक्षांनी माय मराठीची केलेली मोडतोड संतापजनक – काशिनाथ नखाते

suwarna gaware 24/06/2026
b75d053c-42ad-4520-a422-11db2ec46f42
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

सक्तीच्या टीओडी मीटर वरून महावितरणला कायदेशीर नोटीस

suwarna gaware 24/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.