Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • १९ सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना स्टार मानांकन; शासनाकडून एकूण ३८ कोटी ५० लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

१९ सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना स्टार मानांकन; शासनाकडून एकूण ३८ कोटी ५० लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर

suwarna gaware 06/06/2025
af32784d-ede5-4bb9-9638-e8055be99763
Spread the love

जल ही अमृत’ यशस्वी उपक्रमात पिंपरी चिंचवडचा झळाळता नावलौकिक..!

पिंपरी, ६ जून २०२५ : ‘जल ही अमृत’ उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १९ सांडपाणी प्रक्रिया केंद्रांनी (एसटीपी) उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महापालिकेच्या उत्कृष्ट कामाची ही पोचपावती आहे. महानगरपालिकेने आता पिंपरी चिंचवड शहर परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ‘एकात्मिक सांडपाणी कृती आराखडा तयार केला आहे. शहरातील व्यापक प्रमाणात सांडपाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतो, या दृष्ठीने नियोजन सुरू आहे, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने चर्चासत्रे, मार्गदर्शन, गुणगौरव, माझी वसुंधरा शपथ अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या “जल ही अमृत” उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १९ सांडपाणी प्रक्रिया केंद्रांनी उल्लेखनीय कामगिरी करत ५, ४ व ३ स्टार मानांकन मिळवलेल्या जलशुद्धीकरण केंद्र प्रमुखांचा स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी आयुक्त शेखर सिंह बोलत होते. 

आजच्या सत्कारार्थींमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये कार्यरत १७ केंद्र प्रमुख (प्लांट इन्चार्ज), ९ रसायनतज्ञ (केमिस्ट)आणि ५ जलशुद्धीकरण केंद्र चालक यांचा समावेश आहे.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी मंचक जाधव , मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, देवन्ना गट्टूवार, आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल, सोहन निकम, अनिल भालसाखरे, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य केमिस्ट उमा भोगे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, बालेवाडी येथील निकमार युनिवर्सिटीचे प्रा. डॉ. श्रीधर कुंभार, महाराष्ट्र पर्यावरण मंडळाचे फिल्ड ऑफिसर सीमा सावळे, सुर्यकांत शिंदे व अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रात एकूण ३७६ एमएलडी क्षमतेची १९ सांडपाणी प्रक्रिया केंद्रे कार्यरत आहेत. ही केंद्रे १९८७ पासून ते २०२५ पर्यंत विविध कालखंडात कार्यान्वित झाली आहेत. केंद्र शासनाच्या मानांकनासाठी ऑक्टोबर २०२४ आणि जानेवारी २०२५ मध्ये दोन टप्प्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये युनिट ऑपरेशन, देखभाल यंत्रणा, डिस्चार्ज मानके, स्वच्छता, कर्मचारी व्यवस्थापन, बायोसोलिड्स पुनर्वापर, पर्यायी ऊर्जा वापर व नाविन्यपूर्ण उपाय अशा विविध निकषांचा समावेश होता.

यावेळी बोलतांना आयुक्त सिंह म्हणाले, ५ स्टार रेटिंगमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नाव आहे. स्टार रेटिंगमध्येवरच्या क्रमांकावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व १९ मैलाशुद्धीकरण केंद्रांना मानांकन प्राप्त झाले आहे. ही अभिमानस्पद बाब आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हे यश साजरा करतांना आनंद होत आहे. यापुढेही सांडपाणी प्रक्रिया केंद्रांनी अशीच कामगिरी करून सातत्य राखावे असे देखील ते म्हणाले. 

पिंपरी चिंचवड शहरात असा सन्मान सोहळा प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. महापालिकेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ४ प्रक्रिया केंद्रांना ५ स्टार नामांकन मिळाले आहे. हे मानांकन समाधान कारक आहे तथापि आपले पुढील ध्येय हे सर्व STP केंद्रांना ५ स्टार मानांकन मिळवून देणे हे आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी मत व्यक्त केले. 

पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, आपण सामाजिक बांधिलकीतून पर्यावरणाचे आणि समाजाचे काहीतरी देणे लागत असतो, ही जाणीव ठेवून काम प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. ‘जल ही अमृत’ उपक्रमाने शाश्वत जलव्यवस्थापनाचा एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. या उपक्रमात सहभागी सर्व यंत्रचालक, रसायनतज्ञ, ठेकेदार व कर्मचारी यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी केले. तर सूत्रसंचालन, माझी वसुंधरा शपथेचे वाचन आणि आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

शहरातील १९ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केंद्रास एकूण ३८ कोटी ५० लाखांचे बक्षीस-

1. क्र.सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे नावस्टार नामांकनप्राप्त रक्कम
१.चिखली फेज १४२ कोटी रुपये
२.चिखली फेज २५४ कोटी रुपये
३.चऱ्होली फेज १४२ कोटी रुपये
४.चऱ्होली फेज २४२ कोटी रुपये
५.कुदळवाडी३२५ लाख रुपये
६.आकुर्डी४२ कोटी रुपये
७.चिंचवड फेज २५४ कोटी रुपये
८.चिंचवड फेज १, भाटनगर४२ कोटी रुपये
९.रावेत४२ कोटी रुपये
१०.सांगवी सांडपाणी प्रक्रिया केंद्र५४ कोटी रुपये
११.दापोडी४२ कोटी रुपये
१२.कासारवाडी फेज १४२ कोटी रुपये
१३.कासारवाडी फेज २४२ कोटी रुपये
१४.कासारवाडी फेज ३५४ कोटी रुपये
१५.भोसरी २१७३७५ लाख रुपये
१६.पिंपळे निलख४२ कोटी रुपये
१७.भोसरी गार्डन३७५ लाख रुपये
१८.केशवनगर३२५ लाख रुपये
१९.वाल्हेकरवाडी४५० लाख रुपये
 एकूण ३८ कोटी ५० लाख

पंचतारांकित (५ स्टार) आणि चार तारांकित (४ स्टार) नामांकन मिळविलेली सांडपाणी प्रक्रिया केंद्रे – 

1. क्र.केंद्र चालक केंद्रांचे नाव नामांकन
१मे. श्रीविनय इंजिनियरिंग सर्व्हिसेस प्रा. लि.कासारवाडी फेज ३  ५ स्टार 
२मे. एक्सेल इलेक्ट्रिकल्सचिंचवड SBR (फेज २) ५ स्टार 
३मे. एक्सेल इलेक्ट्रिकल्सचिखली SBR (फेज २) ५ स्टार 
४मे. एच. एन.बी. इंजिनिअर्स प्रा. लि.सांगवी५ स्टार 
५मे. जे. डी. खानदेशीचऱ्होली एसटीपी ४ स्टार 
६मे. डब्ल्युटीईवाल्हेकरवाडी एसटीपी४ स्टार 

 सन्मान करण्यात आलेल्या केंद्र प्रमुखांची नावे-

1. क्र.सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे नाव केंद्र प्रमुखाचे नाव  
१कासारवाडी टप्पा १,२,३संजय बालगोडा कुरळे
२भाटनगर   संजय परशुराम जाधव
३पिंपळे  निलख अक्षय आनंदा घाटगे
४सांगवीशिवाजी  किसनराव मुळे 
५आकुर्डीपंडित  शिवराज  बिडवे
६चिंचवड  अर्जुन सुखदेव गोखले 
७चिंचवड  शुभम रणजित साखरे
८चिखली फेज १    बसवराज करबसप्पा कांबळे
९चिखली फेज २  अक्षय महेश भेंडे
१०रावेतअजित अनिल पाटील
११दापोडीसुभाष पोमू नाईक
१२चऱ्होलीराहूल उत्तमराव सावते
१३कुदळवाडीमयूर सुरेश भुजबळ
१४भोसरी २१७रोहित राजेंद्र भुजबळ
१५भोसरी ५ एमएलडीअंकुश  दिगंबर नवले
१६वाल्हेकरवाडीविकास कुंडलिक गोदाम  
१७केशवनगरकेतन कृष्णा कुलकर्णी

 सन्मान करण्यात आलेल्या केमिस्टची नावे-

1. क्र.सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे नाव केमिस्टचे नाव 
१कासारवाडीकांचन अतुल पाटील
२पिंपळे  निलख श्रध्दा प्रितम वाणी
३दापोडीज्योती योगेश कांबळे
४चिंचवड जयश्री दिलिप मोहिते
५भाटनगरअक्षता कल्पेश चव्हाण
६रावेतप्रथमेश संजय देसाई
७सांगवीस्वीटी मधुकर मोरे
८चिखली ऐश्वर्या नाना कवडे
९आकुर्डीधनश्री यशवंत जाधव

सर्व उपस्थितांनी घेतली माझी वसुंधरा शपथ

आम्ही भारताचे सुजाण नागरिक शपथ घेतो कि, आम्ही या भारत मातेला, या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करू, या वसुंधरेला या पर्यावरणाला आमच्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन. आम्ही या देशाला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी कटीबध्द राहू व आमच्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम आम्ही करणार नाही, जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू, अशा आशयाची शपथ यावेळी सर्व उपस्थितांनी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या उपस्थितीत घेतली.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 162
Tags: #enviorment #STP Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त ३०० रोपांचे वृक्षारोपण
Next: शहाजीराजांच्या संकल्पनेतून जिजाऊंच्या मार्गदर्शनाने छ. शिवाजीमहाराजांनी स्वराज्य निर्माण केले: प्रकाश जाधव

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.