


लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने रहाटणीत ११व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

पिंपरी, दि. ४: समाजातील वंचीत, पीडित, दुबळ्या, सर्वसामान्य घटकांचा आवाज बनण्याची प्रेरणा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या संस्कारातून आणि विचारातून मिळाली. त्यांच्या याच तालमीत महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते तयार झाले. असे कार्यकर्ते भविष्यातही तयार व्हावेत यासाठी त्यांचे हे संस्कार येणाऱ्या नवीन पिढ्यांमध्येही रुजविण्याची गरज आहे, अशा शब्दांत माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले.
लोकनेते स्व. गोपींनाथ मुंडे प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त रहाटणी येथील स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब मार्ग याठिकाणी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा कार्याध्यक्ष दीपक नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते, टाटा मोटर्स सहकारी पतपेढीचे खजिनदार सुभाष दराडे, सामाजिक कार्यकर्ते दीपक मनेरे गुणवंत कामगार महाराष्ट्र शासन बाळासाहेब साळुंखे, महिंद्र गायकवाड, लक्ष्मण गरकळ, निवृत्ती वनवे यांच्यासह शहरातील मुंडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️