


पुणे, ता. ४: नुकतीच ३० ते २०२५ रोजी दुपारी ४ वाजता सदर महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पिं.चिं. चेंबरचे अध्यक्ष प्रेमचंद मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सदर सर्वसाधारण सभा मोशी एमआयडीसीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या सभागृहात झाली . येथे दिनांक २९ ते ३१ मे रोजी पॅकेजिंग उद्योगातील उत्पादक कंपन्यांचे प्रदर्शन होते. महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा येथील सभागृहात झाली.

वेस्टर्न महाराष्ट्र ही संघटनांची महासंघ संघटना सन २०१० मध्ये पिं.चिं.चेंबरच्या पुढाकाराने सुरू झाली. यापुढे वृध्दीसाठी कार्यकारिणीचा नऊ (९) जिल्हयातील व्यापक विस्तार झाल्याने घटनात्मक कार्यकारणींची घोषणा आवश्यक होती. आजच्या सदर वार्षिक सर्वसाधारण सभेने महासंघाच्या १० वर्षाच्या कालावधीनंतर अध्यक्षपदी अॅड. आप्पासाहेब शिंदे यांची बिनविरोध एकमताने ठराव संमत केला.
मा.अध्यक्षांना संपुर्ण कार्यकारिणी निवडीचे अधिकार दिले. तथापि, उपस्थितातुन मा.उपाध्यक्षपद नाशिक येथील (आयमा) संघटनेला आणि सचिवपद बारामती मॅन्युफॅक्चरर्स असो. (बिमा) ला जाहीर केले. संपूर्ण कार्यकारिणी आठवडयाने जाहीर करण्याचा अधिकार मा. नवीन अध्यक्षांना दिला असे.
आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेने एकमताने, कुदळवाडी चिखली उद्योजकांवर पिं.चिं. महापालिकेने केलेल्या कारवाईचा निषेध ठराव संमत केला. पश्चिम महाराष्ट्रातील नऊ जिल्हयातील हजारो उद्योजकांना सक्रिय पाठिंबा कुदळवाडी चिखली बाधित उद्योजकांना मिळाल्याने उद्योजकांना लढाईस प्रेरणा मिळणार आहे.
वेस्टर्न महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी प्रदर्शनकारी उद्योजक संस्था ‘फ्यूचर मार्केट इव्हेंटस् प्रा.लि. नवी दिल्ली, गुरगावचे संचालक मंडळ आणि पदाधिकारी यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आय.टी. उद्योजक निलय वानखडे यांनी तर आभारप्रदर्शन ‘बिमा’ हया बारामती असो. अध्यक्ष श्री. धनंजय जामदार यांनी मानले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️