


पिंपरी, दि. २: चंदीगड येथे दिनांक 29 मे ते 2 जून या कालावधीत संपन्न झालेल्या 43वी ज्युनियर सॉफ्टबॉल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये टोटल 28 राज्यांनी सहभाग नोंदवला होता , त्यामध्ये महाराष्ट्र संघाने तृतीय क्रमांक पटकावला. चंदीगड राज्याचे मुख्य सचिव राजीव वर्मा यांच्या हस्ते तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

महाराष्ट्रा टीम मध्ये पिंपरी चिंचवड शहरांमधील दापोडी आनंदवन गावाचे सुपुत्र कु. अनोश अनिल कांबळे हा होता . महाराष्ट्र टीमचे हार्दिक अभिनंदन केले.
महाराष्ट्र टीमचे कोच , अक्षय येवले, कल्पेश कोल्हे, गणेश दादा, भीमा मोरे, चेतन चौधरी, पिंपरी चिंचवड असोशियन सचिव योगेन कुमार अशेर सर, सहसचिव, ऐश्वर्या साठे मॅडम, स्मिता मॅडम, राज्य क्रीडा अधिकारी प्रतिश पाटील, अक्षता बांगर मॅडम ऋषिकेश काळे सर यांनी अनोश ला शुभेच्छा दिल्या.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
