Skip to content
04/06/2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

cropped-images.jpeg

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2024
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते भरत जाधव यांनी साधला महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद…
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते भरत जाधव यांनी साधला महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद…

suwarna gaware 02/06/2025
fd78a819-befc-4de0-8f2c-ac68d64c8388
WhatsApp Image 2025-03-24 at 8.48.54 AM
Spread the love

महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी ”आता थांबायचं नाय” या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग…

पिंपरी, दि. २ जून २०२५ – सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘’आता थांबायचं नाय’’ या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करून पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यांना प्रेरणा देण्याचे तसेच त्यांच्यामध्ये शिक्षणाचे महत्व रूजविण्याचे जे काम केले आहे ते कौतुकास्पद असून शिक्षणासाठी झगडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आवाज या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यास मदत होईल असे गौरवद्गार सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भरत जाधव यांनी काढले.

पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिका आपल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता व मानसिक आरोग्याच्या वाढीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. अशाच एका उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सफाई सेवकांसाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘आता थांबायचं नाय’ या प्रेरणादायी मराठी चित्रपटाचे खास स्क्रीनिंग आज पिंपरी येथील विशाल सिनेमा येथे आयोजित करण्यात आले होते.

या विशेष कार्यक्रमास उप आयुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड यांच्यासह विशाल थिएटरचे संचालक वसंत पिंपळे, विशाल पिंपळे, युवराज पिंपळे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

अभिनेते भरत जाधव म्हणाले, शहर स्वच्छता ही सामाजिक जबाबदारी मानून सफाई सेवक पहाटेपासून शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारी पार पाडतात. स्वच्छतेचे रिअल हिरो ते आहेत, मी तर केवळ भूमिका पार पाडली. ‘’आता थांबायचं नाय’’ हा केवळ एक चित्रपट नाही, तो सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीची गोष्ट आहे.

शिक्षण ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे मग तो अधिकारी असो की सफाई कामगार हा संदेश या चित्रपटाच्या माध्मातून देण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षणासाठी झगडणाऱ्या या कर्मचाऱ्यांची कहाणी मला भावली. त्यांच्या जिद्दीला सलाम करत अशी प्रेरणादायी सत्यकथा सगळ्यांसमोर मांडणे ही कलाकार म्हणून माझी जबाबदारी आहे असे मला वाटले आणि संपुर्ण महाराष्ट्रात सध्या हा चित्रपट गाजतो आहे. विशेषत: पिंपरी चिंचवड महापालिकेने पुढाकार घेऊन सफाई कर्मचाऱ्यांना हा चित्रपट दाखवला ही बाब कौतुकास्पद आहे.

उप आयुक्त सचिन पवार म्हणाले, सफाई सेवकांच्या दैनंदिन संघर्ष, अडचणी आणि अनुभवांवर आधारित असलेल्या “आता थांबायचं नाय” चित्रपटामध्ये त्यांचे कार्य समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही कलाकृती सफाई कामगारांच्या मेहनतीची आणि योगदानाची दखल घेणारी आहे. त्यांच्या कामाबद्दल समाजामध्ये आदर व जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट या स्क्रीनिंगमागे आहे.

आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या निर्देशानुसार अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच पिंपरी चिंचवडमध्ये राबविला जात आहे. सफाई सेवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, कामाबाबत सजगता वाढवणे व त्यांच्या कार्याला प्रेरणा देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे सफाई सेवकांनाही त्यांच्या कार्याचा अभिमान वाटेल, आणि अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

दरम्यान, यावेळी सर्व उपस्थितांनी अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेतली.चित्रपट पाहिल्यानंतर हा चित्रपट ह्रदयस्पर्शी असल्याचे मत आणि समाधान सफाई कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आणि अभिनेते भरत जाधव यांचे देखील अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पवार यांनी, सुत्रसंचालन आणि स्वच्छता शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर अण्णा बोदडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 10
Tags: #bharat jadhav Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: कमी उत्सर्जन क्षेत्रांच्या अंमलबजावणीसाठी ब्रिटिश उच्च उपायुक्त आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वपूर्ण कार्यशाळेचा शुभारंभ
Next: चंदीगड राज्याचे मुख्य सचिव राजीव वर्मा यांच्या हस्ते पारितोषिक

Related Stories

0272844d-1526-4075-b32a-9a7b5df8b536
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत

suwarna gaware 03/06/2025
Official_Logo_of_PCMC
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!

suwarna gaware 03/06/2025
7f565d00-923e-49ae-adf4-0f8242b4b983
  • Daily Breaking News
  • Poilitical

स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन

suwarna gaware 03/06/2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत 0272844d-1526-4075-b32a-9a7b5df8b536 1

दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत

03/06/2025
हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका! Official_Logo_of_PCMC 2

हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!

03/06/2025
स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन 7f565d00-923e-49ae-adf4-0f8242b4b983 3

स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन

03/06/2025
फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते f790e38e-4340-4d80-9ecd-d46415d32236 4

फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते

03/06/2025
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती Official_Logo_of_PCMC 5

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

03/06/2025

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

0272844d-1526-4075-b32a-9a7b5df8b536
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत

suwarna gaware 03/06/2025
Official_Logo_of_PCMC
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!

suwarna gaware 03/06/2025
7f565d00-923e-49ae-adf4-0f8242b4b983
  • Daily Breaking News
  • Poilitical

स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन

suwarna gaware 03/06/2025
f790e38e-4340-4d80-9ecd-d46415d32236
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते

suwarna gaware 03/06/2025

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत
  • हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!
  • स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन
  • फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते
  • आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.